केलेल्या कामांची माहिती पोर्टलवर अपलोड करावी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

केलेल्या कामांची माहिती पोर्टलवर अपलोड करावी
                                       
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा
     
आजपर्यंत 2 लक्ष 50 हजार कामे पूर्ण 

वाशिम, दि.18 (जिमाका) जिल्हयात ‘ कॅच द रेन ’ या मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवड,विहीर पुनर्भरण,बोअर दूरुस्ती,शोषखड्डे,छतावर पडणाऱ्या पावसाचे संकलन,अस्तीत्वात असलेल्या स्ट्रक्चरच्या दुरुस्तीसह विविध प्रकारची कामे यंत्रणांकडून करण्यात येत आहे.या कामामुळे भूगर्भात पाण्याच्या साठवणूकीसह विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या कामाला मदत होत आहे.यंत्रणांनी या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती काम पूर्ण होताच संबंधित पोर्टलवर अपलोड करावी. अशी सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी केली.
              आज 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘ कॅच द रेन ’ मोहिमेचा आढावा श्री. षण्मुगराजन यांनी घेतला यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,उपवनसंरक्षक श्री. मीणा,जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.वानखेडे, मृद व जलसंधारण विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंता पूर्वा नानवटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
        श्री.षण्मुगराजन म्हणाले, पावसाळयाच्या दिवसात यंत्रणांनी वृक्ष लागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे.तसेच ज्या यंत्रणांना वाढीव वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे ते सुध्दा पुर्ण करावे.ग्रामीण भागाता रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे खाजगी इमारतीवर करतांना गावच्या सरपंचाच्या घरापासून याची सुरुवात करावी.गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या कामांच्या उद्दीष्टपूर्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करावा.कोणत्याही परिस्थितीत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून शोषखड्डयांची कामे गट विकास अधिकाऱ्यांनी प्राधान्याने पुर्ण करावी.या मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी केंद्र सरकारचे अधिकारी करणार असल्यामुळे गट विकास अधिकारी व विविध यंत्रणांनी त्यांच्या चांगल्या कामांची यादी तयार करुन ठेवावी. जेंव्हा हे अधिकारी या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हयात येतील तेंव्हा त्यांना ही कामे दाखविता येतील.असे श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले.
        श्रीमती पंत म्हणाल्या,जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत या मोहिमेअंतर्गत विविध कामे करण्यात येत आहे.संबंधित यंत्रणांनी त्यांच्यामार्फत करण्यात येणारी कामे निर्धारीत वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष देण्यात येत आहे. या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी शाळा व महाविद्यालय स्तरावरुन विविध स्पर्धांचे शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
      " कॅच द रेन " या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत  2 लक्ष 50 हजार 267 वृक्ष लागवडीची आणि 1122 जलसंधारणाची कामे अशी एकूण 2 लक्ष 50 हजार 267 कामे पूर्ण करण्यात आली असून ही कामे पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता  श्रीमती नानवटकर यांनी यावेळी दिली.
        या सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक आंधकाम विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक,जिल्हा भूजल आणि सर्व्हेक्षण विकास यंत्रणा,सामाजिक वनिकरण उपसंचालक यांचे प्रतिनिधी,सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी,सर्व नगर पालिका/नगर पंचायचे मुख्याधिकारी तसेच संबंधित यंत्रणाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. 
*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे