Posts

Showing posts from August, 2021

यशने गाठले किलीमांजारो शिखर आता स्वप्न एव्हरेस्ट गाठण्याचे 15 ऑगस्टला किलीमांजारोवर फडकविला राष्ट्रध्वज

Image
  यशने गाठले किलीमांजारो शिखर आता स्वप्न एव्हरेस्ट गाठण्याचे 15 ऑगस्टला किलीमांजारोवर फडकविला राष्ट्रध्वज वाशिम ,   दि. 24 (जिमाका) :   दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर निश्चित केलेले ध्येय सहज पुर्ण करता येते, अशाच एका ध्येयाची पुर्तता वाशिम येथील 19 वर्षीय तरुण यश मारोती इंगोले याने आफ्रीका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमांजारोची 19 हजार 341 फुटाची चढाई करुन केली. विशेष म्हणजे ही कामगिरी यशने 15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनी किलीमांजारोवर राष्ट्रध्वज फडकवून केली. किलीमांजारो चढण्याचे ध्येय गाठल्यानंतर आता त्याचे स्वप्न जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट गाठण्याचे आहे. वाशिम तसा मागास जिल्हा. मोठया प्रमाणात क्रीडा सुविधा उपलब्ध नसतांना तसेच जिल्हयाच्या भौगोलीक क्षेत्रात दऱ्याखोऱ्या, पर्वतरांगा नसतांना देखील यश गिर्यारोहणाची आवड आपल्या वडिलांकडून जोपासत दररोज 10 कि.मी. धावणे आणि 20 कि.मी. सायकलींग करणे असा यशचा नित्यक्रम झाला आहे. रविवारी तर यश 30 ते 35 किलोमीटर सायकलींग करतो. वडिलांकडून त्याने गिर्यारोहणाचा छंद जोपासला आहे. आपल्या मुलाने या क्षेत्रात नाव कमावि

सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून निधी निर्धारित वेळेत खर्च करावा - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
·          जिल्हा नियोजन समिती सभा वाशिम , दि. १५ (जिमाका) : जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून वाशिमचा समावेश आकांक्षीत जिल्ह्यात केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून उपलब्ध निधी निर्धारित वेळेत खर्च करावा व विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. नियोजन भवन येथे आज, १५ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे , खासदार भावना गवळी , आमदार अॅड. किरणराव सरनाईक , आमदार लखन मलिक , आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत , पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले , जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर सनियंत्रण करणारी समिती गठीत करण्यात येईल. जिल्हा समितीकडून देण्यात ये

शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषि संकुल असावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
  ·          स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाचे ई-भूमिपूजन   वाशिम , दि. १५ (जिमाका) : राज्यातील शेतकरी आणि शेती हीच आपली प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांसाठी नव्या संकल्पनेतून काम करण्यात येत आहे. वाशिम येथे उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे कृषि संकुल असावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आज, १५ ऑगस्ट रोजी वाशिम येथील स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाच्या ई-भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.   कृषिमंत्री दादाजी भुसे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शाम गाभणे , खासदार भावना गवळी , आमदार ऍड. किरणराव सरनाईक , आमदार अमित झनक , जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत , पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी

शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
·          वाशिम येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात ·          जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण वाशिम , दि. १५ (जिमाका) : आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून कृषि उत्पन्न वाढविणे व शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात सुद्धा शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शेतीसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.   यावेळी पद्मश्री नामदेव कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेसाठी १० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Image
    वाशिम ,   दि. ०४ (जिमाका) : नवी दिल्ली येथील केंद्रीय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाच्यावतीने विविध खेळ प्रकारातील ‘अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा’ आयोजित केल्या जातात. निरनिराळ्या राज्य शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांसाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ , निवड चाचणी घेवून स्पर्धेसाठी पाठविले जातात.   राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबीराची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी आपल्या विभागात, कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यालय, विभागामध्ये कार्यरत असलेले खेळाडू अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास सदर बाब आणून टेबल टेनिस , बॅडमिंटन , फुटबॉल , हॉकी , क्रिकेट , व्हॉलीबॉल , जलतरण , बास्केटबॉल , ब्रीज , कॅरम , बुध्दीबळ , ॲथलेटीक्स , लघुनाट्य , कबड्डी , वेटलिफ्टींग , पावरलिफ्टींग , शरीरसौष्ठव , कुस्ती , लॉन टेनिस , नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय भारतीय नागरी सेवा स्पर्धे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी १२ ऑगस्टपर्यंत अर्ज करा

  वाशिम ,   दि. ०४ (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वाशिम जिल्हा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे. तरी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या गुणानुक्रमानुसार जिल्ह्यातील प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांना उपलब्ध निधीच्या अधीन राहून अण्णभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. याकरिता गरजू विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड, दोन फोटो, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रांसह १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे अर्ज करावेत, असे आवाहन श्री. गाभणे यांनी केले आहे

क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

Image
    वाशिम , दि. ०३ (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज , ३ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केले. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. तायडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. *****