अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेसाठी १० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 



 वाशिम, दि. ०४ (जिमाका) : नवी दिल्ली येथील केंद्रीय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाच्यावतीने विविध खेळ प्रकारातील ‘अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा’ आयोजित केल्या जातात. निरनिराळ्या राज्य शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांसाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ, निवड चाचणी घेवून स्पर्धेसाठी पाठविले जातात.

 राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबीराची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी आपल्या विभागात, कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यालय, विभागामध्ये कार्यरत असलेले खेळाडू अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास सदर बाब आणून टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुध्दीबळ, ॲथलेटीक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टींग, पावरलिफ्टींग, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय भारतीय नागरी सेवा स्पर्धेमध्ये नियमित सराव करणाऱ्या ज्या अधिकारी, कर्मचारी खेळाडू यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील आवेदनपत्रकारिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे संपर्क साधावा. प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे दोन प्रतीमध्ये आवेदनपत्र भरून ते कार्यालय अथवा विभाग प्रमुखांच्या मान्यतेने १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे सादर करावे, असे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे