क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन
वाशिम, दि. ०३ (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात आज, ३ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केले.
यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. तायडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
*****
Comments
Post a Comment