साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी १२ ऑगस्टपर्यंत अर्ज करा

 

वाशिम, दि. ०४ (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वाशिम जिल्हा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे. तरी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या गुणानुक्रमानुसार जिल्ह्यातील प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांना उपलब्ध निधीच्या अधीन राहून अण्णभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. याकरिता गरजू विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड, दोन फोटो, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रांसह १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे अर्ज करावेत, असे आवाहन श्री. गाभणे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे