Posts

Showing posts from November, 2021

लसीकरण वेगाने करण्यासोबतच यंत्रणा सतर्क असावी - पालकमंत्री शंभुराज देसाई व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे ओमॉक्रॉन संसर्ग टाळण्याच्या पूर्वतयारीचा आढावा

Image
  लसीकरण वेगाने करण्यासोबतच यंत्रणा सतर्क असावी        - पालकमंत्री शंभुराज देसाई व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे ओमॉक्रॉन संसर्ग टाळण्याच्या पूर्वतयारीचा आढावा वाशिम दि. 30 (जिमाका) : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी ओमॉक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता सर्वच पात्र व्यक्तींचे लसीकरण वेगाने पुर्ण करण्यात यावे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सतर्क असावी असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. आज 30 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री श्री. देसाई यांनी ओमॉक्रॉनचा विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने पुर्व तयारीचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. श्री. देसाई म्हणाले, जिल्हयात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे.

सर्व पात्र व्यक्तींना पहिला डोस 10 डिसेंबरपर्यंत दयावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

  सर्व पात्र व्यक्तींना पहिला डोस 10 डिसेंबरपर्यंत दयावा        - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. वाशिम दि. 30 (जिमाका) : कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. भविष्यात कोरोनाची तिसरी लाट केव्हा येईल हे निश्चित सांगता येत नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करणे हा   एकमेव उपाय आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींचे पहिल्या डोसचे 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण लसीकरण   करण्यात यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. 29 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी तालुकास्तरीय यंत्रणांचा कोरोना लसीकरण आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, श्री. विंचणकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धर्मपाल खेडकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. श्री. षण्मुगराजन म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे रुग्ण संख्येत देखील घट झाली आह

1 डिसेंबर जागतिक एड्स दिन एच.आय.व्ही. / एड्स आणि आजचा युवक

  1 डिसेंबर जागतिक एड्स दिन एच.आय.व्ही. / एड्स आणि आजचा युवक ‘मातेकडून होणाऱ्या बाळाला एचआयव्ही/एड्स संसर्गापासून प्रतिबंध करणे’ यापुर्वीचे घोष वाक्य असून 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीयस्तरावरुन ते तळागळापर्यंत युवकांकरीता एच. आय. व्ही./ एड्स जनजागृती निर्माण करणे नितांत गरजेचे आहे. कारण हा आजार 18 ते 50 या वयोगटामध्ये प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. म्हणुन युवकांनी त्याचा तोल या काळात सांभाळला व स्वजागृत झाला तर या आजाराला प्रतिबंध होवू शकतो. आजच्या काळामध्ये एच.आय व्ही/ एड्स संदर्भात भरपूर ज्ञान हे इंटरनेटच्या माध्यमातुन उपलब्ध आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची स्थापना झाल्यापासून या विषयाची माहिती आपण शासकीय जिल्हा रुग्णालयस्तरावरुन ते ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत उपलब्ध आहे. तरी प्रत्येक युवकांने याचे ज्ञान घेतल्यास निश्चितचं या आजारापासून दुर राहू शकेल तसेच आपल्या आरोग्यासंबंधी असणारे रुग्णालयातील समुपदेशनाव्दारे युवकामध्ये असणाऱ्या समस्यांचे समाधान नक्कीच करता येईल. अशी सुविधा करण्यात आली आहे. 1 डिसेंबर हा जाग

*राज्यघटनेप्रती बांधिलकी जोपासावी* न्या. शैलजा सावंत संविधान व विधी दिन साजरा

Image
*राज्यघटनेप्रती बांधिलकी जोपासावी*                         न्या. शैलजा सावंत  संविधान व विधी दिन साजरा  वाशिम दि 26 (जिमाका) ज्येष्ठ विधिज्ञांनी भारतीय राज्यघटनेप्रती आणि कायद्याप्रती आपली बांधिलकी जोपासून वर्षातून काहीतरी प्रकरणांमध्ये कोणतेही शुल्क न करता गोरगरिबांची बाजू मांडावी. असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत यांनी व्यक्त केले.                 आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन आणि विधी दिनाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा न्यायालयात करण्यात आले होते, यावेळी न्या. श्रीमती सावंत अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून न्यायिक अधिकारी सर्वश्री एस.एम.मेनजोगे, एस पी.शिंदे,आर. पी. कुलकर्णी, विधीज्ञ संघाचे सचिव ऍड एन टी जुमडे यांची उपस्थिती होती.          यावेळी न्या.श्री शिंदे यांनी नागरिकांचे मूलभूत कर्तव्य,न्या. कुलकर्णी यांनी मध्यस्थीचे फायदे,ऍड. दिपाली सांभर यांनी मूलभूत अधिकार या विषयावर आपले विचार मांडले.                कार्यक्रमाला वाशिम जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकारी पी. एच. नेरकर, एस. के. खान, पी.पी देशपांडे, जी.बी ज

*संविधान दिन साजरा* पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात शहीद जवानांना श्रद्धांजली

Image
*संविधान दिन साजरा* पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात शहीद जवानांना श्रद्धांजली वाशिम दि.26 (जिमाका)भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी तसेच नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी, याकरिता 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक कार्यालयात पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री. कांबळे यांचे पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.यावेळी अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, श्री.खंडेराव ,श्री.पवार,पोलीस उपनिरीक्षक अश्विनी धोंडगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.       यावेळी मुंबई येथील ताज हॉटेलवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यातील शहीद जवान तसेच वाशीम जिल्ह्यात सन 2013 मध्ये गुन्हेगारांना पकडत असताना गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले हिरा रेघीवाले,

महिला अत्याचार निर्मूलन दिनानिमित्त* पोलिस अधीक्षकांनी घेतला वर्षभरातील महिला हिंसाचार रोखण्याच्या कामगिरीचा आढावा

Image
*महिला अत्याचार निर्मूलन दिनानिमित्त*  पोलिस अधीक्षकांनी घेतला वर्षभरातील महिला हिंसाचार रोखण्याच्या कामगिरीचा आढावा  वाशिम दि.26(जिमाका) 25 नोव्हेंबर हा दिवस जगभर संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून 25 नोव्हेंबर रोजी आयोजित आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी जिल्ह्यातील महिला हिंसाचार रोखण्याच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी श्री. खंडेराव, महिला तक्रार निवारण कक्ष प्रभारी, निर्भया पथकाचा पोलीस उपनिरीक्षक धोंगडे व इतर अधिकारी उपस्थित होते.               जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला तक्रार निवारण कक्ष जिल्हास्तर आणि पोलीस स्टेशन स्तरावर कार्यरत आहे. महिलांच्या प्राप्‍त तक्रारींची दखल घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात येते. तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत करण्यात येते. सन 2021 मध्ये आतापर्यंत 259 तक्र

राष्ट्रीय रायफल व पिस्टल शुटिंग स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार

Image
राष्ट्रीय रायफल व पिस्टल शुटिंग स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचा  जिल्हाधिकारी यांच्या हस्ते  सत्कार वाशिम दि.26 (जिमाका) नुकत्याच पार पडलेल्या अहमदाबाद (गुजरात) येथील 8 व्या प्री-नँशनल झोन रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये श्री.शिवाजी विद्यालय वाशिमचा विद्याथी रुषभ ढवळे,राज्यस्थान कला महाविद्यालयाचा क्षितिज राऊत,माउंट कारमेल शाळेचा अरहंत घुगे आणि कानडे इंटरनँशनल स्कुलची विद्यार्थिनी जानवी मानतकर आणि शांती निकेतन इंग्लिश स्कुलची  मृणाली आकरे या विद्यार्थ्यांनी अहमदाबाद (गुजरात ) येथे उत्कृष्ट कामगिरी करून प्रि-नँशनल रायफल शुटींग स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करून यश संपादन केले.या 5 विद्यार्थ्यांची  दिल्ली व भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या 64 व्या राष्ट्रीय स्तरावरील  राष्ट्रीय रायफल व पिस्टल शूटिंग स्पर्धत निवड झाल्याबद्दल 25 नोव्हेंबर रोजी  जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करण्याकरिता जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी शुभेच्छा दिल्या.

#संविधानदिवस #ConstitutionDay2021

#वाशिम आज २६ नोव्हेंबर  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने १९६८ साली महापुरुष डॉ. आंबेडकर हा माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटाची दुर्मिळ चित्रफित पाहण्यासाठी     खालील लिंकला क्लिक करा  https://t.co/LWCn4KtxIY #संविधानदिवस #ConstitutionDay2021

जिल्ह्यात 11 डिसेंबरला राष्ट्रीय लोक न्यायालय

Image
जिल्ह्यात 11 डिसेंबरला राष्ट्रीय लोक न्यायालय           * सर्व तालुका न्यायालयांमध्ये होणार सुनावणी           * दाखलपुर्व, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा समावेश वाशिम, दि. २४ (जिमाका) ११ डिसेंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दाखलपुर्व व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश संजय शिंदे यांनी केले आहे.             राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे,कामगारांचे वाद,  विद्युत आणि पाणी देयकाबद्दलची आपसात तडजोड करण्याजोगी प्रकरणे वगळून इतर प्रकरणे,आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद,भू-संपादन प्र

*जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश अर्ज* 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन भरावे

Image
*जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश अर्ज* 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन भरावे  वाशिम दि.23 (जिमाका) जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा वर्ग 6 वीच्या सन 2022-23 च्या प्रवेशासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यास सुरुवात झाली आहे.परंतु वर्ग पाचवीमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेश परीक्षा सन 2022 वर्ग 6 वीचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने 17 नोव्हेंबरपर्यंत भरले आहेत व प्रवेश अर्ज भरतांना शाळेची माहिती असलेले प्रमाणपत्र फक्त पालकांच्या सहीने अपलोड केलेले आहे, त्यांनी त्या प्रमाणपत्रावर विद्यार्थी सध्या पाचव्या वर्गामध्ये ज्या शाळेत शिकत असेल त्या शाळेतील मुख्याध्यापकांची सही व शिक्का घेऊन प्रमाणपत्राची प्रत जवाहर नवोदय विद्यालय,वाशीम येथील कार्यालयीन वेळेत जमा करावी.               यापुढेही विद्यार्थी व पालक नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन 2022 वर्ग 6 वीचा अर्ज करतील, त्यांनी सुधारित प्रमाणपत्र अपलोड करून ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021आहे .अर्ज https:cbseitms.nic.in/registration Class6 या संकेतस्थळावर भरता येईल.

पोलीस अधिक्षकांनी घेतलाअवैध धंद्यावरील कारवाई व हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांचा आढावा

Image
पोलीस अधिक्षकांनी घेतला अवैध धंद्यावरील कारवाई व हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांचा आढावा                                                      वाशिम ,   दि. 23 (जिमाका) :   जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी 16 ते 22 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याचे आदेश देवून यादरम्यान जिल्ह्यातील माहितगार गुन्हेगार,वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार आणि हिस्ट्रीशीटवर असलेले गुन्हेगार तपासण्याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी दिले होते. त्याबाबतचा आढावा श्री. बच्चन सिंह यांनी घेतला. वरील कालावधीत जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनअंतर्गत विशेष पथके तयार करुन 109 हिस्ट्रीशिटर, 120 माहितीगार गुन्हेगार, दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले 120 आरोपी तपासण्यात आले. तसेच जातीय दंगल करणारे एकूण 475 गुन्हेगार तपासण्यात आले. दारुबंदी कायद्यान्वये 64 केसेस दाखल करुन कारवाई करण्यात आली. त्यात 1 लाख 8 हजार 850 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये 40 केसेस दाखल करुन 85 इसमांविरुध्द कारवाई करुन 48 हजार 71 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. गुन्हेगारी प्रव

189 ग्रामपंचायत सदस्य निवडणूकीसाठी 118 ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता

Image
189 ग्रामपंचायत सदस्य निवडणूकीसाठी 118 ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता वाशिम दि.22(जिमाका) जिल्ह्यातील 118 ग्रामपंचायतीमध्ये विविध कारणाने रिक्त झालेल्या 189 ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 118 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून म्हणजे 17 नोव्हेंबरपासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजे 27 डिसेंबर 2019 पर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.           *निवडणूक कार्यक्रम*  जिल्ह्यातील ग्रामपंचायतींतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.  22 नोव्हेंबर 2021 - नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करणे.  22 नोव्हेंबर 2021- तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 सकाळी 11 ते दुपारी 3 व

रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे* शासकीय व सेवाभावी संस्थांनी संपर्क साधावा

Image
रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे*  शासकीय व सेवाभावी संस्थांनी संपर्क साधावा वाशिम दि.22 (जिमाका) मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करून त्यांना मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार/ स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्धतेद्वारे परिवार व समाजाचा एक उत्पादक सदस्य म्हणून सन्मानाने आपले भावी आयुष्य समर्थपणे घडविता यावे, यासाठी कौशल्य विकासासंबंधी सर्वसमावेशक अभियान सुरू आहे.          जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाच्या वतीने अशाच कौशल्य विकासासंबंधित वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबविण्यात येतात. जिल्ह्यातील रोजगार/ स्वयंरोजगार इच्छुक युवक-युवतींना कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग,सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/ स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना मागणी आवश्यक त्या क्षेत्रात प्रशिक्षित करून देण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक खाजगी, शासकीय-निमशासकीय सेवाभावी संस्थांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत भेटावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

पोलिसांनी घेतली मुलीच्या ई-मेल तक्रारीची दखल

Image
*पोलिसांनी घेतली मुलीच्या ई-मेल तक्रारीची दखल*  वाशिम दि.22 (जिमाका) पोलीस आपल्या कर्तव्य आणि जबाबदारीबाबत किती दक्ष राहून काम करतात याची प्रचिती 18 नोव्हेंबर 2021 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाला कारंजा येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या ई-मेलवरुन आली.            सविस्तर माहिती अशी की, कारंजा येथे इयत्ता 9 वीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीच्या मोबाईलवर एक अनोळखी व्यक्ती तिला वारंवार फोन करुन तसेच व्हिडिओ कॉल करून त्रास देत होता.या मुलीने पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविलेल्या ई-मेलवर या घटनेची माहिती दिली. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी तात्काळ मुलीच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिस यंत्रणा या कामी लावली. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या कारंजा येथील निर्भया पथकाला तात्काळ सुचना करून या मुलीच्या मदतीसाठी जाण्याचे सांगितले.          कारंजा येथील निर्भया पथक तात्काळ मुलीच्या घरी पोहचले. मुलीच्या घरी पोहोचताच तिची तक्रार समजून घेतली.सायबर सेल वाशिमकडून त्या मुलीला ज्या मोबाईल क्रमांकावरुन कॉल येत होता, त्याचे लोकेशन घेऊन व त्या क्रमांकावर संपर्क करून शहानिशा केली.

कृषी विभाग प्रशिक्षण कार्यक्रम रिचार्ज पिट निर्मिती व फायदे

Image
कृषी विभाग प्रशिक्षण कार्यक्रम                           रिचार्ज पिट निर्मिती व फायदे                                     वाशिम, दि. 22 (जिमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त वतीने निती आयोगामार्फत नुकताच वाशिम तालुक्यातील नागठाणा येथे रिचार्ज पिट निर्मिती आणि त्याचे फायदे या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कृषी उपसंचालक नीलेश ठोबंरे यांनी रिचार्ज पीट योजनेची विस्तृत माहिती दिली. रिचार्ज पीटचे महत्व विशद करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. रिचार्ज पीटसारख्या मृद व जलसंधारण कार्यक्रमामध्ये आपल्या जमिनीची धूप थांबून जमीनीतील पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे त्याचा पिकास फायदा होवून उत्पन्न वाढत असल्याचे श्री ठोंबरे यांनी सांगितले. कार्यक्रमाला सरपंच अमरसिंह सोळंके,मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, कृषी सहायक डी. एस. खुळे, भागवत देशमुख, श्री सोळंके व श्री राठोड तसेच नागठाणा येथील शेतकरी उपस्थित होते. सरस्वती समाजकार्य महावि

*जिल्ह्याने गाठला लसीकरणाचा 10 लाखाचा टप्पा*

Image
*जिल्ह्याने गाठला लसीकरणाचा 10 लाखाचा टप्पा*  वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करायचा असेल तर लसीकरण हाच एकमात्र उपाय आहे. जिल्ह्यातील लोकांना भविष्यात कोरोनाची बाधा होऊ नये याकरीता जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत पहिला डोस 6 लाख 51 हजार 479 व्यक्तींना आणि दुसरा डोस 3 लाख 71 हजार 904 व्यक्तींना देण्यात आल्याने जिल्ह्यात 10 लाख 23 हजार 373 व्यक्तींचे लसीकरण करून जिल्ह्याने 10 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे.          कोरोना ही जागतिक महामारी. संपूर्ण जग कोरोना संसर्गाने हैरान असताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांनी केलेल्या अथक संशोधनातून अखेर कोरोनाला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यात यश आले. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यात.कोरोनाच्या दोन्ही लाटेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याची वेळ आली. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केव्हा येईल हे मात्र निश्चित सांगता येणार नाही.कोरोना प्रतिबंधासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे.               जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध करण्यासाठी तालुका

लसीकरण हलगर्जीपणा भोवला *दोन ग्रामसेवक निलंबित*

लसीकरण हलगर्जीपणा भोवला     *दोन ग्रामसेवक निलंबित*  वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याची मोहीम सूक्ष्म नियोजनातून राबविण्यात येत आहे. यासाठी लसीकरण केंद्रावर कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. सुट्ट्यांच्या दिवशी देखील लसीकरण केंद्रातून लसीकरण करण्यात येत आहे.              आज 19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी वाशिम तालुक्यातील काही गावातील लसीकरण केंद्राला आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीदरम्यान मंगरूळपीर तालुक्यातील शिवनी येथील ग्रामसेवक अनंता गायकी आणि वाशिम तालुक्यातील सावळी येथील ग्रामसेवक श्री.मळघणे हे गैरहजर आढळून आले. त्यांच्या या गैरहजरीची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी आज 19 नोव्हेंबर रोजी एका आदेशाद्वारे या दोन्ही ग्रामसेवकांना निलंबित केले.            जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी  जिल्हा व तालुका पातळीवर वारंवार सभा घेण्यात येत आहे. लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या

*जिल्हाधिकाऱ्यांची लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेट*

Image
*जिल्हाधिकाऱ्यांची लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेट*    गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई  वाशिम दि.19(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 19 नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर आणि कारंजा तालुक्यातील काही गावातील कोविड लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीदरम्यान लसीकरण केंद्रावर गैरहजर आढळलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.           कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येत नाही. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याची मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोणताही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजनातून काम करीत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व पात्र व्यक्तींना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस 100 टक्के देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.        सुट्टीच्या दिवशी सुद्धा लसीकरण करण्यात येत आहे.आज 19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी काही केंद्रा

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची गोलवाडी व मंगळसा लसीकरण केंद्राला भेट

Image
*जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची गोलवाडी व मंगळसा लसीकरण केंद्राला भेट* वाशिम दि.19 (जिमाका) जिल्ह्यात कोविड लसीकरणाने वेग घेतला असून जिल्ह्यात येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात सर्व सुट्टीच्या दिवशीसुद्धा लसीकरण करण्यात येत आहे.आज 19 नोव्हेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी मंगरूळपीर तालुक्यातील गोलवाडी व मंगळसा लसीकरण केंद्राला भेट दिली.            गोलवाडी येथील प्राथमिक शाळेत असलेल्या लसीकरण केंद्राला डॉ. आहेर यांनी भेट दिली.यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.एस.आर.सुर्वे,शाळेचे केंद्र प्रमुख श्री.कुटे, तलाठी एस.डी. खिल्लारे, आरोग्यसेविका श्रीमती वाडेकर,अंगणवाडी सेविका श्रीमती पोफळकर व आशा कार्यकर्ती श्रीमती शिंदे यांची उपस्थिती होती.              गोलवाडीची लोकसंख्या 1628 असून लसीकरणासाठी 1181 व्यक्ती पात्र आहे.आतापर्यंत 893 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. 288 व्यक्तींचे लसीकरण बाकी असल्याची माहिती डॉ.सुर्वे यांनी दिली.गावातील सर्व पात्र व्यक्तींच्या घरोघरी भेट देऊन 30 नोव्हेंबरपर्यंत लसीक

खेलो इंडिया अंतर्गत 22 नोव्हेंबरला कबड्डी, खो-खो व बॉस्केटबॉल स्पर्धा निवड चाचणीचे आयोजन

Image
खेलो इंडिया अंतर्गत 22 नोव्हेंबरला कबड्डी, खो-खो व बॉस्केटबॉल स्पर्धा निवड चाचणीचे आयोजन वाशिम, दि. 18 (जिमाका) :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्तवतीने जिल्हास्तरीय खेलो इंडिया अंतर्गत कबड्डी, खो-खो व बॉस्केटबॉल स्पर्धेचे आयोजन 22 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. केंद्र शासनाअंतर्गत 4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन फेब्रुवारी 2022 मध्ये हरियाणा येथे निश्चित करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये 21 खेळ प्रकारांचा समावेश असून त्यापैकी सर्वप्रथम कबड्डी, खो-खो व बॉस्केलबॉल या क्रीडा प्रकाराकरीता 18 वर्षातील मुलां-मुलींचा 1 जानेवारी 2003 च्या जन्म झालेल्या खेळाडूंना जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येईल. या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन व निवड चाचणी 22 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे करण्यात येणार आहे. कबड्डी मुले व मुली यांच्या स्पर्धा मॅटवर घेण्यात येईल. खेळाडूंनी कबड्डी कीटमध्ये उपस्थित राहावे. कबड्डी स्पर्धेकरीता मुलांकरीता 70 किलो वजनगट व मुलींकरीता 65 किलो

शहा येथे श्रमशिबीराचे आयोजन

Image
शहा येथे श्रमशिबीराचे आयोजन वाशिम, दि. 18 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने पशुसंवर्धन विभागामार्फत कारंजा तालुक्यातील शहा येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात श्रमशिबीराचे आयोजन आज 18 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या शिबीरामध्ये जनावरांची गर्भतपासणी, वंधत्व तपासणी, कृत्रिम रेतन, खच्चीकरण, औषधोपचार, सर्व पशुधनांचे लसीकरण पुर्ण करणे, पशुसंवर्धन हा कृषीसाठी जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, 100 टक्के दुग्धजन्य जनावरांचे संवर्धन करणे तसेच शेतकऱ्यांना उत्कृष्ट पध्दतीच्या चारापीक निर्मितीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबीराला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारंजा पंचायत समितीचे डॉ. एस.एम. सुर्यवंशी, डॉ. ए.एन. जठाळे तसेच शहा येथील पशुपालक मोठया संख्येने उपस्थित होते. *******

खेलो इंडिया कबड्डीकरीता खेळाडूंची होणार निवड, प्रशिक्षक निवडीकरीता अर्ज मागविले

Image
खेलो इंडिया कबड्डीकरीता खेळाडूंची होणार निवड, प्रशिक्षक निवडीकरीता अर्ज मागविले वाशिम, दि. 18 (जिमाका) :  वाशिम येथे खेलो इंडियाचे प्रशिक्षण शिबीर मंजूर करण्यात आले आहे. या शिबीराकरीता 15 मुले आणि 15 मुली अशा 30 खेळाडूंची निवड करण्याची कार्यवाही तसेच खेलो इंडिया कबड्डी सेंटरकरीता प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याच्या दृष्टीकोनातून अर्ज मागविले आहे. कबड्डी खेळाडू निवडीकरीता ज्या खेळाडूंनी  SAI@https://nsrs.kheloindia. gov.in  या संकेतस्थळावर आयटी प्राप्त केलेले खेळाडू व जे खेळाडू खेलो इंडियाच्या निकषानुसार पात्र ठरतील अशा खेळाडूंची निवड खेलो इंडिया सेंटरमध्ये निवड करण्यात येईल. तसेच ज्या खेळाडूंनी अद्यापही वरील दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली नाही. त्यांनी या संकेतस्थळावर आपली नोंदणी केलेल्या खेळाडूंना खेलो इंडियाच्या सेंटरमध्ये निकषानुसार 28 नोव्हेंबर रोजी निवडीकरीता चाचणी देता येईल. खेलो इंडिया सेंटर कबड्डी प्रशिक्षण निवडीकरीता 18 ते 45 वयोगट यामध्ये अतिउच्च कामगिरी/ गुणवत्ता असल्या समितीच्या मान्यतेने 50 वर्षाच्या उमेदवारांना संधी देण्यात यावी. ज्यांनी आंतरराष्ट्रीय कबड्ड

जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह साजरा

Image
जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह साजरा वाशिम, दि. 18 (जिमाका) :  15 ते 21 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे 17 नोव्हेंबर रोजी प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात नवजात शिशू बालकांची काळजी व कांगारु मदत केअर तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत मुलींच्या शिक्षणाचे व जन्माचे महत्वाबद्दल उपस्थित मातांना मार्गदर्शन करण्यात आले. अतिजोखमीच्या मातांची यावेळी आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. यादव, डॉ. हेडाऊ, डॉ. राठोड, श्रीमती हजारे, श्रीमती भालेराव, श्रीमती ललिता घुगे, श्रीमती प्रफुलता तायडे, श्रीमती राजपूत, श्री. तिवारी, ॲड. राधा नरवालिया, संदेश डहाळे, श्री. घुगे, श्री. देशमुख व श्री. वसीम उपस्थित होते. *******

पत्रव्यवहार व कामकाजात मराठीचा वापर अनिवार्य मराठी भाषा समितीची सभा संपन्न

पत्रव्यवहार व कामकाजात         मराठीचा वापर अनिवार्य मराठी भाषा समितीची सभा संपन्न वाशिम, दि. 18 (जिमाका) :  सर्वसामान्य जनतेशी करण्यात येणारा सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांना मराठी भाषेत करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अनिनियम 2021 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीची सभा समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. समितीचे अशासकीय सदस्य मोहन शिरसाट व दिपक ढोले यांचेसह काही शासकीय सदस्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मराठी या राजभाषेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हयातील सर्व कार्यालयाकडून 6 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार परिशिष्ट-अ नुसार स्वयंघोषणापत्र तसेच मराठी भाषेच्या वापराबाबत त्रैमासिक अहवाल मागविण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्रिभाषा सुत्रानुसार कार्यालयातील नावांच्या पाटया, सुचना फलक, जाहिराती तसेच कार्यालयीन शिक्के, जिल्हास्तरीय संकेतस्थळे इत्यादीमध्ये मराठी भाषा वापरणे बंधनकारक आहे. जिल्हा व तालुका स्तरावर मराठी भाषेसंदर्भात

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवजिल्हा ग्रंथालय कार्यालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन

Image
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हा ग्रंथालय कार्यालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन   वाशिम, दि. 17 (जिमाका) :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे 17 नोव्हेंबर रोजी दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. दिवाळी अंक प्रदर्शनात सामना, माझा, जत्रा, सकाळ, मार्मिक, लोकप्रभा, माहेर, धनंजय, कालनिर्णय, चंद्रकांत, अनुराग, अहेर, दिपोत्सव, वसुधा, मेनका, आवाज, शब्दगांधार, शामसुंदर, वेदान्वश्री, शुरसेनानी, अक्षर, वसंत, गृहलक्ष्मी, फिरकी, घरचा वैद्य, रुचकर, भारत पर्यटन, दिवाळी फराळ, पुढारी, मनोकल्प, मैत्र, दुर्ग, आरोग्य, भन्नाट, महाराष्ट्र टाईम्स व लोकसत्ता इत्यादी अंक ठेवण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ लिपीक ग.भी. बेंद्रे, एस.एस. कंडारकर, विलास कांबळे, स्पर्धा परिक्षेचे तयारी करणारे विद्यार्थी व विद्यार्थींनींची उपस्थिती होती. *******

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी चार मतदान केंद्र प्रस्तावित

Image
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी चार मतदान केंद्र प्रस्तावित   वाशिम, दि. 17 (जिमाका) :  येत्या 10 डिसेंबर 2021 रोजी अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूकीसाठी जिल्हयात चार मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजतापर्यंत या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समिती सभापतीसाठी वाशिम मुख्यालयी तहसिल कार्यालयातील मिटींग हॉल येथे, कारंजा नगर परिषदेच्या सदस्यांसाठी तहसिल कार्यालय कारंजा येथे, मंगरुळपीर नगर परिषदेच्या सदस्यांसाठी तहसिल कार्यालय मंगरुळपीर येथे आणि रिसोड नगर परिषदेच्या सदस्यांसाठी तहसिल कार्यालय रिसोड येथे हे मतदान केंद्र प्रस्तावित असून प्रारुप यादी जाहिर केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहिर अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. तो पुढील प्रमाणे आहे. 16 नोव्हेंबर 2021- निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करणे,  23 नोव्हेंबर 2021- नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिवस, 24 नोव्हेंबर 2021- नामनिर्देशन पत्राच

समाज बांधवांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करा -जिल्हाधिकारी षण्मुगराजन, धर्मगुरु व समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींची सभा

Image
  समाज बांधवांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करा -जिल्हाधिकारी षण्मुगराजन धर्मगुरु व समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींची सभा वाशिम, दि. 16 (जिमाका) : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केंव्हा येईल हे सांगता येणार नाही. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे. कोरोना लसीबाबत समाजात गैरसमज आहे. कोरोना लस ही सुरक्षित आहे. कोरोना लसीबाबतचे समाजात असलेले गैरसमज दूर करुन मुस्लीम समाजातील धर्मगुरु व प्रतिष्ठीत व्यक्तींनी समाज बांधवांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले. आज 16 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात कोविड लसीकरणाबाबत मुस्लीम धर्मगुरु व समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या सभेत श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक मोरे, मो. शमीम अक्तर हाबीदी, इमाम मोबीन अहमद काझमी व मो. इद्रीस रझा यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. षण्मुगराजन म्हणाले, मी स्वत: एका खेडयात जावून लस घेतली आहे. त्यामुळे लसीबाबतचे ग्रामीण भागात असलेले गैरसमज दूर झाले. राज्यात लसी

मतदार नोंदणीचा नागरिकांना संदेश ..

Image
मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२२ च्या निमित्ताने महाराष्ट्राचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा मतदार नोंदणीचा नागरिकांना संदेश .. https://t.co/jNQTr47Sbf
Image
  योग्य नियोजन व समन्वयातून लसीकरण पुर्ण करा                                                                           -षण्मुगराजन एस. तालुका यंत्रणांचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा वाशिम, दि. 15 (जिमाका) : कोविड लसीकरणासाठी काम करणाऱ्या तालुका पातळीवरील यंत्रणांनी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी तालुका पातळीवर योग्य नियोजन व समन्वयातून काम करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. आज 15 नोव्हेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुका यंत्रणांचा कोविड लसीकरण आढावा घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, नोडल अधिकारी असलेले अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार (मानोरा), निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे (मालेगांव), उपजिल्हाधिकारी संदीप महाजन (कारंजा), सुनील विंचनकर (रिसोड), सुवासिनी गोणेवार (वाशिम) तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमेश तांगडे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद व

16 नोव्हेंबरच्या विशेष ग्रामसभेत सहभाग नोंदवा - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन · मतदार यादीत नाव नोंदणी दुरुस्ती · नाव वगळता येणार

  16 नोव्हेंबरच्या विशेष ग्रामसभेत सहभाग नोंदवा -          जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ·        मतदार यादीत नाव नोंदणी दुरुस्ती ·        नाव वगळता येणार   वाशिम, दि. 15 (जिमाका) : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करुन ही यादी त्रृटी विरहीत करण्याचा व 1 जानेवारी या अर्हता दिनांकापासून नविन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम दरवर्षी भारत निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येतो. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण करणारे नवमतदार यांची नोंदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आता हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहोचावा यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावामध्ये 16 नोव्हेंबर 2021 रोजी पहिल्यांदाच यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत आहे. तरी मतदार असलेल्या सर्व नागरीकांनी या विशेष ग्रामसभेत आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे. जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती हया 16 नोव्हेंबर 2021 रोजी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पु

बालक हे देशाचे भविष्य आहे न्या. शैलजा सावंत बाल दिन व आजादी का अमृत महोत्सवाचा समारोप

Image
बालक हे देशाचे भविष्य आहे                      न्या. शैलजा सावंत बाल दिन व आजादी का अमृत महोत्सवाचा समारोप  वाशिम दि.14 (जिमाका) बालक हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे. राष्ट्राची व आई-वडिलांची सेवा करावी, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्या. श्रीमती शैलजा सावंत यांनी केले.             14 नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालय येथे बालदिन आणि आजादी का अमृतमहोत्सव समारोपाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन न्या. श्रीमती सावंत बोलत होत्या. यावेळी न्या.डॉ. श्रीमती रचना तेहरा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संजय शिंदे. न्या आर.डी. शिंदे, जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ऍड एन टी जुमडे, सहसचिव ऍड विनोद सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.         न्या.डॉ. श्रीमती तेहरा यांनी  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत बालकांसाठी बालक स्नेही विधी सेवा बालकांचे संरक्षण योजना - 2015 या विषयावर, न्या.आर.पी.शिंदे यांनी शिक्षणाचा अधिकार, पोलीस कॉन्स्टेबल दीपक घुगे यांनी सायबर गुन्हे याविषयी मार्गदर्शन केले.         कार्यक्रमांम