जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह साजरा

जिल्हा रुग्णालयात

राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह साजरा


वाशिम, दि. 18 (जिमाका) : 15 ते 21 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे 17 नोव्हेंबर रोजी प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात नवजात शिशू बालकांची काळजी व कांगारु मदत केअर तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत मुलींच्या शिक्षणाचे व जन्माचे महत्वाबद्दल उपस्थित मातांना मार्गदर्शन करण्यात आले. अतिजोखमीच्या मातांची यावेळी आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. यादव, डॉ. हेडाऊ, डॉ. राठोड, श्रीमती हजारे, श्रीमती भालेराव, श्रीमती ललिता घुगे, श्रीमती प्रफुलता तायडे, श्रीमती राजपूत, श्री. तिवारी, ॲड. राधा नरवालिया, संदेश डहाळे, श्री. घुगे, श्री. देशमुख व श्री. वसीम उपस्थित होते.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश