अनुसचित जाती व नवबौध्द घटकांसाठी मार्जिन मनी योजना

अनुसचित जाती व नवबौध्द घटकांसाठी मार्जिन मनी योजना

वाशिम, दि.11(जिमाका) अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांकरीता 8 मार्च 2019 नुसार केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेतून मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना 9 डिसेंबर 2020 आणि 26 मार्च 2021 नुसार शासनस्तरावरुन निश्चित करण्यात आल्या आहे. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
      तरी सदर योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचेकडे शासन निर्णयात नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव सादर करावा.असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त, एम.जी. वाठ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे