*जिल्ह्याने गाठला लसीकरणाचा 10 लाखाचा टप्पा*

*जिल्ह्याने गाठला लसीकरणाचा 10 लाखाचा टप्पा* 

वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करायचा असेल तर लसीकरण हाच एकमात्र उपाय आहे. जिल्ह्यातील लोकांना भविष्यात कोरोनाची बाधा होऊ नये याकरीता जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत पहिला डोस 6 लाख 51 हजार 479 व्यक्तींना आणि दुसरा डोस 3 लाख 71 हजार 904 व्यक्तींना देण्यात आल्याने जिल्ह्यात 10 लाख 23 हजार 373 व्यक्तींचे लसीकरण करून जिल्ह्याने 10 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे.   
      कोरोना ही जागतिक महामारी. संपूर्ण जग कोरोना संसर्गाने हैरान असताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांनी केलेल्या अथक संशोधनातून अखेर कोरोनाला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यात यश आले. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यात.कोरोनाच्या दोन्ही लाटेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याची वेळ आली. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केव्हा येईल हे मात्र निश्चित सांगता येणार नाही.कोरोना प्रतिबंधासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे.  
            जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध करण्यासाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर विविध यंत्रणांना सोबत घेऊन जिल्हा प्रशासनाच्या सभा होत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवून लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करून शंभर टक्के लसीकरणावर भर देण्यात आला आहे.आतापर्यंत जिल्ह्यात पहिला डोस 6 लाख 51 हजार 479 व्यक्तींना देण्यात आला.ही टक्केवारी 66.32 टक्के तर दुसरा डोस 3 लाख 71 हजार 904 व्यक्तींना देण्यात आला असून ही टक्केवारी 37.86 टक्के इतकी आहे. लवकरच जिल्हा पात्र व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देखील सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे