*संविधान दिन साजरा* पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात शहीद जवानांना श्रद्धांजली

*संविधान दिन साजरा*
पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात शहीद जवानांना श्रद्धांजली

वाशिम दि.26 (जिमाका)भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी तसेच नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी, याकरिता 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक कार्यालयात पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री. कांबळे यांचे पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.यावेळी अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, श्री.खंडेराव ,श्री.पवार,पोलीस उपनिरीक्षक अश्विनी धोंडगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      यावेळी मुंबई येथील ताज हॉटेलवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यातील शहीद जवान तसेच वाशीम जिल्ह्यात सन 2013 मध्ये गुन्हेगारांना पकडत असताना गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले हिरा रेघीवाले, 1965 च्या भारत - पाकिस्तान युद्धात शत्रूशी लढताना शहीद झालेले मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथील भारतीय सैन्यातील शिपाई यशवंत सरकटे, जम्मू काश्मीर येथे ओपी रक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले मालेगाव तालुक्यातील मुंगसाजीनगर येथील दगडू लहाने, जम्मू काश्मीर येथे ओपी रक्षक म्हणून कर्तव्य बजावताना शहीद झालेले मानोरा तालुक्यातील येथील निरंजन ठाकरे यांना यावेळी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. शहीद जवानांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.
            प्रमुख पाहुणे पदश्री.नामदेव कांबळे यांनी उपस्थित सर्वांना संविधान दिन आणि शहीद दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. श्री.कांबळे यांनी स्वतःच्या जीवन प्रवासाबद्दल सांगताना उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना पद्मश्रीपर्यंत पोहचण्याकरीता किती खडतर प्रवास केला यासाठी जिद्द आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. 
               वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांकरिता रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यशस्वी झालेले विद्यार्थी आणि शाळांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आले.
     विविध स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय, कानडे इंटरनॅशनल स्कूल, हॅप्पी फेसेस, माउंट कार्मेल आणि केंद्रीय विद्यालय येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.
       चित्रकला स्पर्धेत माउंट कार्मेल शाळेची विजया सकपाळ यांनी प्रथम, उन्नती शिंदे हिने द्वितीय आणि जवाहर नवोदय विद्यालयची गौरी विसपुते हिने तृतीय क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेसाठी माझे संविधान - माझा अभिमान तसेच माझ्या भारताचा राष्ट्रीय ग्रंथ संविधान हे विषय देण्यात आले होते.निबंध स्पर्धेत शिवाजी विद्यालयाच्या प्रेम घुमरे याने प्रथम, माउंट कारमेल विद्यालयाची श्रेया निराळे द्वितीय आणि जवाहर नवोदय विद्यालयाचा आदेश निचल याने तृतीय क्रमांक पटकाविला.
            रांगोळी स्पर्धेत नवोदय विद्यालयाने प्रथम,कानडे इंटरनॅशनल विद्यालय द्वितीय आणि हॅपी फेसस विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी 13 शाळांचे 105 विद्यार्थी व 12 शिक्षक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे