1 डिसेंबर जागतिक एड्स दिन एच.आय.व्ही. / एड्स आणि आजचा युवक

 

1 डिसेंबर जागतिक एड्स दिन

एच.आय.व्ही. / एड्स आणि आजचा युवक

‘मातेकडून होणाऱ्या बाळाला एचआयव्ही/एड्स संसर्गापासून प्रतिबंध करणे’ यापुर्वीचे घोष वाक्य असून 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीयस्तरावरुन ते तळागळापर्यंत युवकांकरीता एच. आय. व्ही./ एड्स जनजागृती निर्माण करणे नितांत गरजेचे आहे. कारण हा आजार 18 ते 50 या वयोगटामध्ये प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. म्हणुन युवकांनी त्याचा तोल या काळात सांभाळला व स्वजागृत झाला तर या आजाराला प्रतिबंध होवू शकतो.

आजच्या काळामध्ये एच.आय व्ही/ एड्स संदर्भात भरपूर ज्ञान हे इंटरनेटच्या माध्यमातुन उपलब्ध आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची स्थापना झाल्यापासून या विषयाची माहिती आपण शासकीय जिल्हा रुग्णालयस्तरावरुन ते ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत उपलब्ध आहे. तरी प्रत्येक युवकांने याचे ज्ञान घेतल्यास निश्चितचं या आजारापासून दुर राहू शकेल तसेच आपल्या आरोग्यासंबंधी असणारे रुग्णालयातील समुपदेशनाव्दारे युवकामध्ये असणाऱ्या समस्यांचे समाधान नक्कीच करता येईल. अशी सुविधा करण्यात आली आहे.

1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन पार्श्वभुमीवर तरुणांना देशात उद्भवलेल्या महामारीचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे. कारण एच. आय. व्ही. चा संसर्ग हा जागतिक पातळीवरची आरोग्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगात या संसर्गामुळे जवळपास 3.5 कोटी लोकांना जीव गमवावा लागला आहे. ज्यामध्ये लैंगीक कार्यक्षम असणारा वयोगट हा 18 ते 50 आहे. आपल्या देशातील युवकांमध्ये असलेले देशाविषयी प्रेम हे अबाधित राखण्याकरीता आज प्रत्येक युवकाला देशाकरीता समाजकार्य करण्याची नितांत गरज आहे.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी यांच्या अंतर्गत जिल्हास्तरावरील जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक सामान्य रुग्णालय, वाशिम यांच्या वतीने दरवर्षी जागतिक एड्स दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील 6 तालुक्यातील तसेच जिल्हास्तरावर उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय येथील एचआयव्ही समूपदेशन व तपासणी केंद्र सुरु आहेत.

जिल्हयातील प्रत्येक शहरामध्ये व गांवामध्ये, प्रत्येक गरोदर माता, क्षयरुग्ण, स्थालांतरीत कामगार, देहविक्री करणाऱ्या महिला, समलैंगिक संबध ठेवणारे पुरुष या व्यतीरिक्त सामान्य व्यक्तींची एचआयव्ही तपासणी व समूपदेशन करण्याचे महत्वपूर्ण कार्य या विभागामार्फत केले जात आहे. आज जिल्हयातील एच.आय.व्ही.संसर्गाचे प्रमाण बऱ्यापैकी नियंत्रणात आले आहे. समाजामध्ये एच.आय.व्ही. बाबत जे समज व गैरसमज आहेत ते दूर करण्याचे महत्वपूर्ण कार्य या विभागामध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याव्दारे केला जात आहे. एच.आय.व्ही. पासून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी झाले आहे. एच.आय.व्ही. संसर्ग गरोदर मातेपासून होणाऱ्या तिच्या बाळाला संक्रमणापासून वाचविण्याचे प्रमाण पुर्णपणे नियंत्रणात आले आहे.

युवकांना एच.आय.व्ही./एड्स् या आजारापासून सुरक्षीत ठेवण्याकरीता आज युवकांच्या माध्यातूनच एच.आय.व्ही/एड्स जनजागृतीचे कार्य करण्यात येत आहे. जिल्हयातील 15 महाविद्यालयात  रेड रिबन क्लबची स्थापना करुन त्यामाध्यमातून एच.आय.व्ही. जनजागृतीबाबत वेगवेगळ्या स्पर्धा, व्याख्यान, पोस्टर स्पर्धा इ. कार्यक्रम युवकांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. हे कार्य आजचे युवक स्वेच्छेने व आनंदाने करीत आहे. युवकांमध्ये एच.आय.व्ही बाबत जनजागृती बऱ्याच प्रमाणात करण्यात आलेली आहे. तसेच एच.आय.व्ही. सारख्या विषाणूपासून स्वत:चे व समाजाचे रक्षण करुन तरुणांनी आपल्या सभोवताली असणारे सर्व जणांची जबाबदारी स्वीकारुन आत्मनिर्भर भारताच्या उभारणीस आपले मोलाचे योगदान द्यावे. याकरीता आपल्याला एच.आय.व्ही. सारख्या विषाणूपासून स्वत:चे संरक्षण करावे. आजची तरुणपीढी ही उद्याची आत्मनिर्भर पिढी आहे.

 

 

डॉ. धर्मपाल खेळकर

जिल्हा शल्य चिकीत्सक, 

जिल्हा सामान्य रुग्णालय,

 वाशिम. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे