शहा येथे श्रमशिबीराचे आयोजन
शहा येथे श्रमशिबीराचे आयोजन
वाशिम, दि. 18 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने पशुसंवर्धन विभागामार्फत कारंजा तालुक्यातील शहा येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात श्रमशिबीराचे आयोजन आज 18 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या शिबीरामध्ये जनावरांची गर्भतपासणी, वंधत्व तपासणी, कृत्रिम रेतन, खच्चीकरण, औषधोपचार, सर्व पशुधनांचे लसीकरण पुर्ण करणे, पशुसंवर्धन हा कृषीसाठी जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, 100 टक्के दुग्धजन्य जनावरांचे संवर्धन करणे तसेच शेतकऱ्यांना उत्कृष्ट पध्दतीच्या चारापीक निर्मितीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबीराला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारंजा पंचायत समितीचे डॉ. एस.एम. सुर्यवंशी, डॉ. ए.एन. जठाळे तसेच शहा येथील पशुपालक मोठया संख्येने उपस्थित होते.
*******
Comments
Post a Comment