मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
वाशिम, दि. ०१ (जिमाका) मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू झाले असून १ नोव्हेंबरपासून ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्ष किंवा अधिक वय असलेल्या नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे.निवडणुका पारदर्शक आणि न्याय्यपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी पहिल्यांदाच विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२२ या अहर्तावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.
०१ नोव्हेंबर
२०२१ - एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे. ०१ ते ३० नोव्हेंबर २०२१ -
दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी. विशेष मोहिमांचा कालावधी - १३ नोव्हेंबर, १४
नोव्हेंबर, २७ नोव्हेंबर आणि २८ नोव्हेंबर २०२१. विशेष ग्रामसभेचे आयोजन - १६
नोव्हेंबर २०२१. दावे व हरकती निकालात
काढणे - २० डिसेंबर आणि मतदार यादी अंतिम प्रसिद्धी करणे - ०५ जानेवारी २०२२ असा
आहे.
*******
Comments
Post a Comment