खेलो इंडिया अंतर्गत 22 नोव्हेंबरला कबड्डी, खो-खो व बॉस्केटबॉल स्पर्धा निवड चाचणीचे आयोजन

खेलो इंडिया अंतर्गत 22 नोव्हेंबरला

कबड्डी, खो-खो व बॉस्केटबॉल स्पर्धा

निवड चाचणीचे आयोजन


वाशिम, दि. 18 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्तवतीने जिल्हास्तरीय खेलो इंडिया अंतर्गत कबड्डी, खो-खो व बॉस्केटबॉल स्पर्धेचे आयोजन 22 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. केंद्र शासनाअंतर्गत 4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन फेब्रुवारी 2022 मध्ये हरियाणा येथे निश्चित करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये 21 खेळ प्रकारांचा समावेश असून त्यापैकी सर्वप्रथम कबड्डी, खो-खो व बॉस्केलबॉल या क्रीडा प्रकाराकरीता 18 वर्षातील मुलां-मुलींचा 1 जानेवारी 2003 च्या जन्म झालेल्या खेळाडूंना जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येईल. या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन व निवड चाचणी 22 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.


जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे करण्यात येणार आहे. कबड्डी मुले व मुली यांच्या स्पर्धा मॅटवर घेण्यात येईल. खेळाडूंनी कबड्डी कीटमध्ये उपस्थित राहावे. कबड्डी स्पर्धेकरीता मुलांकरीता 70 किलो वजनगट व मुलींकरीता 65 किलो वजनगट निश्चित करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. बॉस्केटबॉल स्पर्धा तालुका क्रीडा संकुल कारंजा येथे आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेतील विजयी संघ हा विभागीयस्तर स्पर्धेकरीता पात्र ठरेल व खेळाडूंनी सोबत येतांना आधारकार्ड, 10 वीचे बोर्ड सर्टीफिकेट, जन्म प्रमाणपत्र 5 वर्षापुर्वी काढलेले असावे व त्याच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्या.


स्पर्धेमध्ये शाळा, क्लब व शाळाबाहय खेळाडू निवड चाचणीकरीता उपस्थित राहू शकतात. कबड्डी स्पर्धेकरीता वाशिम जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव डॉ. भागवत महाल्ले, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी विजय मोटघरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, खो-खो करीता जिल्हा खो-खो- संघटनेचे सचिव गोविंद राऊत, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी अशोक राऊत व राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर आणि बॉस्केटबॉलकरीता जिल्हा बॉस्केटबॉल संघटनेचे सचिव शशिकांत नांदगांवकर व विवेक गहाणकरी इत्यादीच्या निवड समितीतून खेळाडूंची निवड करण्यात येईल. स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे. असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले ओ.  

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे