16 नोव्हेंबरच्या विशेष ग्रामसभेत सहभाग नोंदवा - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन · मतदार यादीत नाव नोंदणी दुरुस्ती · नाव वगळता येणार

 

16 नोव्हेंबरच्या विशेष ग्रामसभेत सहभाग नोंदवा

-         जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

·       मतदार यादीत नाव नोंदणी दुरुस्ती

·       नाव वगळता येणार

 

वाशिम, दि. 15 (जिमाका) : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करुन ही यादी त्रृटी विरहीत करण्याचा व 1 जानेवारी या अर्हता दिनांकापासून नविन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम दरवर्षी भारत निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येतो. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण करणारे नवमतदार यांची नोंदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आता हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहोचावा यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावामध्ये 16 नोव्हेंबर 2021 रोजी पहिल्यांदाच यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत आहे. तरी मतदार असलेल्या सर्व नागरीकांनी या विशेष ग्रामसभेत आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती हया 16 नोव्हेंबर 2021 रोजी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी विशेष ग्रामसभा घेणार आहे. ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नागरीकांना पाहण्यासाठी/ तपासण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच या मतदार यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील सर्व नागरीकांना मतदार यादीमध्ये नोंदी तपासून घेता येणार आहे. मतदार यादीतील नोंदीबाबत नागरीकांना हरकती असल्यास/ त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरीकांना त्यांचे नाव नव्याने नोंदवायचे असल्यास त्यांना विहीत अर्ज ग्रामसभेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने आधिच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय/ तहसिल कार्यालयाकडून आवश्यक अर्जाचे नमुने उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

या अंतर्गत मयत, कायम स्थलांतरीत मतदारांची व लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करणे व ज्यांचे दि. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण होत आहे. त्यांचे नविन मतदार म्हणून नोंदणी करण्याच्या कामावर या ग्रामसभेत भर देण्यात येणार आहे. ग्रामसेवक किंवा संबंधित गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी नागरीकांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. या कामासाठी गावकामगार व तलाठी हे सहकार्य करतील. नागरीकांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती/ आक्षेप/ दुरुस्ती वा नाव नोंदणीच्या अर्जाचे संकलन करुन ग्रामपंचायत कार्यालयाने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

शक्य नसल्यास सदर ग्रामसभेमध्ये नागरीकांनी ऑनलाईन नाव नोंदणी nvsp portal/voter help line या ॲपवरुन कशी करता येते याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे माहिती देणार आहे. नागरीकांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून मतदार यादीबाबतचे कामकाज कसे चालते याची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी दयावी. नागरीकांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे नाव व संपर्क क्रमांक उपलब्ध करुन दयावे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी ग्रामसभेमध्ये गावातील नागरीकांनी दिलेल्या हरकती/ आक्षेप/ दुरुस्त्या वा नाव नोंदणीच्या अर्जाच्या स्थितीबाबत त्या नागरीकांना कोठून व कशी माहिती मिळेल याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे