*कोंडाळा (झामरे) येथे कायदेविषयक शिबीर संपन्न
*कोंडाळा (झामरे) येथे कायदेविषयक शिबीर संपन्न*
वाशिम दि. 11 (जिमाका) वाशिम तालुक्यातील कोंडाळा (झामरे) येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने 11 नोव्हेंबर रोजी आझादी का अमृत महोत्सवानिमीत्ताने कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायदंडाधिकारी जी. बी.जानकर होते. प्रमुख अतिथी म्हणून न्यायदंडाधिकारी आर. पी. शिंदे यांची उपस्थिती होती.प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. एन.टी जुमडे, ॲड. शुभम लुंगे उपस्थित होते.
न्या. जानकर यांनी धनादेश अनादरणबाबतच्या कायद्यातील तरतुदीविषयी माहिती दिली.तसेच इतर विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले.ॲड. जुमडे यांनी जमानत या विषयी,ॲड. लुंगे यांनी मोटर अपघात दावा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांना कायदेविषयक पत्रकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन ॲड. एन.टी जुमडे, यांनी केले. आभार अशोक तायडे यांनी मानले.
Comments
Post a Comment