*जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश अर्ज* 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन भरावे

*जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश अर्ज* 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन भरावे 

वाशिम दि.23 (जिमाका) जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा वर्ग 6 वीच्या सन 2022-23 च्या प्रवेशासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यास सुरुवात झाली आहे.परंतु वर्ग पाचवीमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेश परीक्षा सन 2022 वर्ग 6 वीचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने 17 नोव्हेंबरपर्यंत भरले आहेत व प्रवेश अर्ज भरतांना शाळेची माहिती असलेले प्रमाणपत्र फक्त पालकांच्या सहीने अपलोड केलेले आहे, त्यांनी त्या प्रमाणपत्रावर विद्यार्थी सध्या पाचव्या वर्गामध्ये ज्या शाळेत शिकत असेल त्या शाळेतील मुख्याध्यापकांची सही व शिक्का घेऊन प्रमाणपत्राची प्रत जवाहर नवोदय विद्यालय,वाशीम येथील कार्यालयीन वेळेत जमा करावी.     
         यापुढेही विद्यार्थी व पालक नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन 2022 वर्ग 6 वीचा अर्ज करतील, त्यांनी सुधारित प्रमाणपत्र अपलोड करून ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021आहे .अर्ज https:cbseitms.nic.in/registration Class6 या संकेतस्थळावर भरता येईल.
     अधिक माहितीसाठी हेल्प डेस्क नंबर 07252-233002,
9511607486(उपप्राचार्य),9421351699(ए.पल्लेवाड),8788356190,9604567090,
9421494337,9422826813 आणि 9423722811 या भ्रमणध्वनीवर संपर्क करू शकता.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे