आतापर्यंत जिल्हयातील 9 लाख व्यक्तींचे लसीकरण · 5 लाख 82 व्यक्तींचा पहिला व 3 लाख 23 हजार व्यक्तींनी घेतला दुसरा डोस · ग्रामीण भागातील 6 लाख 39 हजार व्यक्तींचे लसीकरण · 2 लाख 67 हजार शहरी भागातील व्यक्तींचे लसीकरण
आतापर्यंत जिल्हयातील 9 लाख व्यक्तींचे लसीकरण
·
5 लाख 82 व्यक्तींचा पहिला व 3
लाख 23 हजार व्यक्तींनी घेतला दुसरा डोस
·
ग्रामीण भागातील 6 लाख 39 हजार
व्यक्तींचे लसीकरण
·
2 लाख 67 हजार शहरी भागातील
व्यक्तींचे लसीकरण
वाशिम, दि. 2 (जिमाका)
: कोरोना
या जागतीक महामारीला आळा घालण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांनी लस विकसीत
केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीची मात्रा हा एकमेक उपाय असल्यामुळे कोरोना
लसीकरण मोहिमेला 16 जानेवारी 2021 पासून देशभर सुरुवात झाली. वाशिम जिल्हयातील 13
लाख 74 हजार 735 लोकसंख्येपैकी लसीकरणासाठी 9 लाख 82 हजार 300 व्यक्ती पात्र ठरले.
भविष्यात जिल्हयात कोरोनाचा शिरकाव होवू नये तसेच जिल्हयातील कोणतीही व्यक्ती
कोरोना संसर्गाने बाधित होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करुन
आरोग्य, महसूल, ग्रामविकास, पोलीस तसेच अन्य यंत्रणांना सोबत घेवून लसीकरण मोहिम
हाती घेतली. लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करण्यात
आली.
1 नोव्हेंबरपर्यंत लसीकरणासाठी पात्र
असलेल्या 9 लाख 82 हजार 300 व्यक्तीपैकी 9 लाख 6 हजार 267 व्यक्तींचे लसीकरण
करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 5 लाख 82 हजार 751 व्यक्तींनी तर दुसरा डोस 3 लाख
23 हजार 516 व्यक्तींनी घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 59.33 टक्के आणि
दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 32.93 टक्के आहे.
जिल्हयातील सहा तालुक्यात ग्रामीण भागात एकूण
11 लाख 6 हजार 451 इतकी लोकसंख्या आहे. त्यापैकी 7 लाख 92 हजार 471 व्यक्ती
लसीकरणासाठी पात्र ठरले. यापैकी 4 लाख 17 हजार 344 व्यक्तींनी पहिला डोस आणि 2 लाख
21 हजार 903 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण
52.66 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण 28 टक्के इतके आहे. वाशिम
तालुक्यातील 1 लाख 98 हजार 450 लोकसंख्येपैकी 1 लाख 41 हजार 645 व्यक्ती
लसीकरणासाठी पात्र ठरले. यामध्ये पहिला डोस 85 हजार 223 व्यक्तींनी आणि दुसरा डोस
46 हजार 925 पात्र व्यक्तींनी घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 60.17 टक्के तर
दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 33.13 टक्के आहे. कारंजा तालुक्यातील 1 लाख 63 हजार
785 लोकसंख्येपैकी 1 लाख 16 हजार 709 पात्र व्यक्तींपैकी 78 हजार 124 व्यक्तींनी
पहिला डोस तर 44 हजार 584 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. पहिला डोसचे प्रमाण 66.94
टक्के आणि दुसरा डोसचे प्रमाण 38.20 टक्के आहे. मंगरुळपीर तालुक्यातील 1 लाख 61
हजार 885 लोकसंख्येपैकी 1 लाख 15 हजार 229 पात्र व्यक्तींपैकी 70 हजार 107
व्यक्तींनी पहिला आणि 37 हजार 477 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस
घेणाऱ्यांचे प्रमाण 60.84 टक्के व दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 32.52 टक्के आहे.
रिसोड तालुक्यातील 1 लाख 94 हजार 643 लोकसंख्येपैकी 1 लाख 39 हजार 732 पात्र
व्यक्तींपैकी 74 हजार 895 व्यक्तींनी पहिला डोस तर 45 हजार 877 व्यक्तींनी दुसरा
डोस घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 53.60 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे
प्रमाण 32.83 टक्के आहे. मालेगांव तालुक्यातील 2 लाख 12 हजार 200 लोकसंख्येपैकी
लसीकरणासाठी 1 लाख 53 हजार 439 व्यक्ती पात्र ठरले. त्यापैकी 62 हजार 225
व्यक्तींनी पहिला डोस तर 27 हजार 691 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस
घेणाऱ्यांचे प्रमाण 40.55 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 18.05 टक्के
आहे. मानोरा तालुक्यातील 1 लाख 75 हजार 488 लोकसंख्येपैकी लसीकरणासाठी 1 लाख 25
हजार 714 व्यक्ती पात्र ठरले. यापैकी पहिला डोस 46 हजार 770 व्यक्तींनी आणि दुसरा
डोस 19 हजार 349 व्यक्तींनी घेतला पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 37.20 टक्के आणि
दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 15.39 टक्के इतके आहे.
शहरी भागात लसीकरण मोहिमेला पात्र व्यक्तींकडून
चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हयाच्या शहरी भागाची लोकसंख्या 2 लाख 68 हजार 284
इतकी आहे. त्यापैकी लसीकरणासाठी 1 लाख 89 हजार 828 व्यक्ती पात्र ठरले. पहिला डोस
1 लाख 65 हजार 407 व्यक्तींनी घेतला. तर दुसरा डोस 1 लाख 1 हजार 613 व्यक्तींनी
घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 87.14 टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण
53.53 टक्के आहे. वाशिम शहरामधील 87 हजार 985 लोकसंख्येपैकी 62 हजार 855 व्यक्ती
लसीकरणासाठी पात्र आहे. त्यापैकी पहिला डोस 49 हजार 67 व्यक्तींनी आणि दुसरा डोस
33 हजार 426 व्यक्तींनी घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 78.06 टक्के आणि
दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 53.18 टक्के आहे. कारंजा शहराच्या 76 हजार 206
लोकसंख्येपैकी 54 हजार 851 व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहे. त्यापैकी 36 हजार 53
व्यक्तींनी पहिला डोस आणि 20 हजार 91 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस
घेणाऱ्यांचे प्रमाण 65.73 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 36.63 टक्के
आहे. मंगरुळपीर शहराची लोकसंख्या 34 हजार 777 इतकी आहे. लसीकरणासाठी 25 हजार 384
व्यक्ती पात्र असून, त्यापैकी 18 हजार 09 व्यक्तींनी पहिला डोस आणि 10 हजार 526
व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 70.95 आणि दुसरा डोस
घेणाऱ्यांचे प्रमाण 41.47 टक्के इतके आहे. रिसोड शहराची लोकसंख्या 38 हजार 316
इतकी आहे. त्यापैकी लसीकरणासाठी 26 हजार 732 पात्र व्यक्ती असून पहिला डोस 40 हजार
447 आणि दुसरा डोस 23 हजार 361 व्यक्तींनी घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण
151.31 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 87.39 टक्के इतके आहे. मालेगांव
शहराची लोकसंख्या 22 हजार असून, लसीकरणासाठी 13 हजार 914 व्यक्ती पात्र आहे.
यापैकी पहिला डोस 11 हजार 865 व्यक्तींनी आणि दुसरा डोस 8 हजार 61 व्यक्तींनी
घेतला आहे. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 85.27 टक्के आहे. तर दुसरा डोस
घेणाऱ्यांचे प्रमाण 57.93 टक्के इतके आहे. मानोरा शहराची लोकसंख्या 9 हजार इतकी
आहे. लसीकरणासाठी 6 हजार 93 नागरीक पात्र आहे. त्यापैकी पहिला डोस 9 हजार 966
व्यक्तींनी तर दुसरा डोस 6 हजार 148 व्यक्तींनी घेतला आहे. पहिला डोस घेणाऱ्यांचे
प्रमाण 163.56 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 100.90 टक्के आहे.
******
Comments
Post a Comment