कृषी विभाग प्रशिक्षण कार्यक्रम रिचार्ज पिट निर्मिती व फायदे

कृषी विभाग प्रशिक्षण कार्यक्रम

                          रिचार्ज पिट निर्मिती व फायदे                                    

वाशिम, दि. 22 (जिमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त वतीने निती आयोगामार्फत नुकताच वाशिम तालुक्यातील नागठाणा येथे रिचार्ज पिट निर्मिती आणि त्याचे फायदे या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

कृषी उपसंचालक नीलेश ठोबंरे यांनी रिचार्ज पीट योजनेची विस्तृत माहिती दिली. रिचार्ज पीटचे महत्व विशद करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. रिचार्ज पीटसारख्या मृद व जलसंधारण कार्यक्रमामध्ये आपल्या जमिनीची धूप थांबून जमीनीतील पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे त्याचा पिकास फायदा होवून उत्पन्न वाढत असल्याचे श्री ठोंबरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाला सरपंच अमरसिंह सोळंके,मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, कृषी सहायक डी. एस. खुळे, भागवत देशमुख, श्री सोळंके व श्री राठोड तसेच नागठाणा येथील शेतकरी उपस्थित होते. सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिमच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ यांनी केले. आभार कृषी सहायक महादेव सोळंके यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे