रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे* शासकीय व सेवाभावी संस्थांनी संपर्क साधावा

रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे* 
शासकीय व सेवाभावी संस्थांनी संपर्क साधावा

वाशिम दि.22 (जिमाका) मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करून त्यांना मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार/ स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्धतेद्वारे परिवार व समाजाचा एक उत्पादक सदस्य म्हणून सन्मानाने आपले भावी आयुष्य समर्थपणे घडविता यावे, यासाठी कौशल्य विकासासंबंधी सर्वसमावेशक अभियान सुरू आहे. 
        जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाच्या वतीने अशाच कौशल्य विकासासंबंधित वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबविण्यात येतात. जिल्ह्यातील रोजगार/ स्वयंरोजगार इच्छुक युवक-युवतींना कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग,सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/ स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना मागणी आवश्यक त्या क्षेत्रात प्रशिक्षित करून देण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक खाजगी, शासकीय-निमशासकीय सेवाभावी संस्थांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत भेटावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे