तामसी येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न
तामसी येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न
वाशिम, दि. 10 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमातंर्गत 9 नोव्हेंबर रोजी वाशिम तालुक्यातील तामसी येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधिश (वरिष्ठ स्तर) पी. एच. नेरकर होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक ॲड. एन.टी. जुमडे, ॲड. गणेश लव्हाळे व ॲड.शुभम लुंगे यांची उपस्थिती होती.
न्या. नेरकर यांनी बालकाविषयी असलेल्या कायद्याबाबत तसेच इतर कायद्याबाबत मार्गदर्शन केले.ॲड.जुमडे यांनी ज्येष्ठ नागरीक यांच्या निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 या विषयी, ॲड. लव्हाळे यांनी जमीन महसूल अधिनियम आणि ॲड. लुंगे यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ॲड एन.टी. जुमडे यांनी केले. उपस्थितांचे आभार ॲड. गणेश लव्हाळे यांनी मानले. कार्यक्रमाला तामसी ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कायदेविषयक पत्रकांचे उपस्थित ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment