जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर

जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर

*जिल्ह्याची सुधारित पैसेवारी सरासरी ५४ पैसे

*मालेगाव व रिसोड तालुक्याची पैसेवारी ४७ पैसे 

वाशिम दि.१ (जिमाका) - जिल्ह्याच्या सन २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याची सुधारित सरासरी पैसेवारी ५४ पैसे इतकी आहे. जिल्ह्यात एकूण ७९३ महसुली गावे आहेत. त्यापैकी ५७१ गावांची खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त तर २२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे.
      वाशिम तालुक्यात लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या १३१ असून या सर्व गावांची सुधारित पैसेवारी ५७ पैसे आहे. मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची सुधारित पैसेवारी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची पैसेवारी ४७ पैसे, मंगरुळपीर तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ५७ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची पैसेवारी ५९ पैसे आणि मानोरा तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ५९ पैसे इतकी आढळून आली आहे.
                 मालेगाव आणि रिसोड तालुक्याची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे