14 नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालय येथे आजादी का अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम
14 नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालय येथे आजादी का अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम
वाशिम दि.10 (जिमाका) 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यात करण्यात आले. समारोपीय कार्यक्रम जिल्हा न्यायालय येथे 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सुरु होईल.
8 ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्यांना बक्षिसाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच कायदेविषयक मार्गदर्शनही यावेळी करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिमच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला वाशीम येथील सर्व न्यायिक अधिकारी, विधीज्ञ संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित राहणार आहे. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. श्रीमती शैलजा सावंत ह्या असतील.
Comments
Post a Comment