30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करा षन्मुगराजन एस

30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करा

                                                                                  षन्मुगराजन एस.

दूरदृश्यप्रणालीव्दारे लसीकरणाचा आढावा

 

वाशिम, दि. (जिमाका) :  कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. तालुकास्तरीय यंत्रणांनी सुक्ष्य नियोजन करुन ग्रामीण व शहरी भागातील सर्वच पात्र व्यक्तींचे 30 नोव्हेंबरपर्यत पहिल्या डोसचे 100 टक्के  लसीकरण पूर्ण करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिले

 

आज 8 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे कोरोना लसीकरणाचा आढावा आयोजित सभेत घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व प्रभारी जिल्हा शल्य आरोग्य अधिकारी डॉ. डी. पी. खेडकर यांची उपस्थिती होती.

 

श्री षन्मुगराजन म्हणाले, प्रत्येक तालुक्यात दररोज 3 हजार तर जिल्ह्यात दररोज 15 हजार व्यक्तींचे लसीकरण करण्यात यावे. प्रत्येक तालुक्यात लसीकरणासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावे. दररोज करण्यात आलेल्या लसीकरणाचा सायंकाळी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी आढावा घ्यावा. प्रत्येक गावात आतापर्यत लसीकरण झालेल्या व्यक्तींची यादी गावपातळीवर आशा सेविकेकडे उपलब्ध असावी. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांचेशी संपर्क करुन त्यांना लसीकरण केंद्रावर येण्यास सांगावे, असे ते म्हणाले.

 लसीकरणाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्यात यावी असे सांगून श्री षन्मुगराजन म्हणाले, लसीकरणासाठी ग्रामीण भागात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व सदस्यांचे तर शहरी भागात नगराध्यक्ष व नगरसेवकांचे सहकार्य घेण्यात यावे. नगर पालीका क्षेत्रात मुख्याधिकारी यांनी सर्व्हेक्षण करुन किती पात्र व्यक्तींचे लसीकरण झाले आणि किती व्यक्तींचे लसीकरण करणे बाकी आहे, याबाबतची माहिती घ्यावी. शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशी देखील लसीकरण करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत 30 नोव्हेंबरपर्यत पहिल्या डोसचे लसीकरण 100 टक्के पुर्ण करावे. असे सांगितले.

 

श्री निकम म्हणाले,जिल्ह्यातील प्रत्येक गावात व शहरात 30 नोव्हेंबरपर्यत पहिला डोस 100 टक्के पुर्ण करण्यासाठी यंत्रणांच्या अधिनस्त असलेले अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस पाटील, सरपंच, व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य घेण्यात यावे. घरोघरी जावून सर्व्हेक्षण करण्यात यावे. समाजातील काही लोक लसीकरणाला विरोध करीत असतील तर त्यांना लसीकरणाचे फायदे व महत्व पटवून द्यावे. लसीकरणाबाबतचे त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. नोडल अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रात जावून लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा.असे ते म्हणाले.

 

डॉ. आहेर म्हणाले, यंत्रणांनी नियोजनातून 30 नोव्हेंबरपर्यत पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करावे. दिवाळीच्या काळात फारच कमी लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तालुकास्तरीय यंत्रणांनी 100 टक्के लसीकरणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची व तयारीची माहिती दिली. सभेला तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, नगरपालीका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे