राष्ट्रीय रायफल व पिस्टल शुटिंग स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार
राष्ट्रीय रायफल व पिस्टल शुटिंग स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार
वाशिम दि.26 (जिमाका) नुकत्याच पार पडलेल्या अहमदाबाद (गुजरात) येथील 8 व्या प्री-नँशनल झोन रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये श्री.शिवाजी विद्यालय वाशिमचा विद्याथी रुषभ ढवळे,राज्यस्थान कला महाविद्यालयाचा क्षितिज राऊत,माउंट कारमेल शाळेचा अरहंत घुगे आणि कानडे इंटरनँशनल स्कुलची विद्यार्थिनी जानवी मानतकर आणि शांती निकेतन इंग्लिश स्कुलची मृणाली आकरे या विद्यार्थ्यांनी अहमदाबाद (गुजरात ) येथे उत्कृष्ट कामगिरी करून प्रि-नँशनल रायफल शुटींग स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करून यश संपादन केले.या 5 विद्यार्थ्यांची दिल्ली व भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या 64 व्या राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय रायफल व पिस्टल शूटिंग स्पर्धत निवड झाल्याबद्दल 25 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करण्याकरिता जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment