भारतीय डाक विभाग खेळाडू प्रकिया 2021 राष्ट्रीय शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करावी

भारतीय डाक विभाग खेळाडू प्रकिया 2021

राष्ट्रीय शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करावी            

 वाशिम दि.11 (जिमाका) भारतीय डाक विभागाद्वारा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. याकरीता पुढील खेळात आर्चरी, ॲथलेटिक्स,आट्या-पाट्या, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बिलीएंटन्स ॲण्ड स्कुनर, बॉडी बिल्डींग, बॉक्सींग,ब्रिज,कॅरम,चेस, क्रिकेट, सायकलींग, सायकल पोलो, डिफ स्पोर्टस, ईक्वीस्टीन्थ, फंन्सींग, फुटबॉल,गोल्फ, जिम्नॅस्टीक, हॅन्डबॉल, हॉकी, आईस हॉकी, आईस स्केटींग, आईस स्किइंग, ज्युदो, कबड्डी, कराटे, कयाकिंग ॲण्ड एनोईग, खो-खो, कुडो, मल्लखांब, मोटर स्पोर्टस, नेटबॉल,पॅरा स्पोर्टस, पेनाक स्किनक,पोलो, पावर लिफ्टींग,शुटींग, शुटींग बॉल, सेल बॉल, रोलर स्केटींग, रोबिंग, रग्बी, सेपक टाकरा, सॉफ्टबॉल, साफ्टबॉल, साफ्टटेनिस, स्क्वॅश, स्विमींग, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिक्वॉईट, टेनिस, टेनपिन गोलंदाजी, ट्रायथलॉन, टग ऑफ वॉर, व्हालीबाल, वेटलिफ्टींग, वुशु, कुस्ती, ॲचिंग, टेनिस बॉल क्रिकेट इत्यादी खेळातील शालेय क्रीडा स्पर्धेतील प्रविण्य प्राप्त खेळाडू हे जाहिरातीमधील वयोमर्यादा व इतर बाबींची पुर्तता करतात अशा खेळाडूंनी विहित नमुन्यातील फॉम क्र. 4 प्रमाणित करुन प्राप्त करण्यासाठी खेळाडू विनंती अर्ज, खेळाडूंचे राष्ट्रीयस्तरावर प्राविण्य, सहभाग प्रमाणपत्र, आधारकार्ड व माहिती अर्ज सदरची कागदपत्रे दिनांक 17 नोव्हेबर 2021 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिव्हील लाईन, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.असे प्रभारी जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे