Posts

Showing posts from 2015

शिवार झाले जलयुक्त, बळीराजा झाला चिंतामुक्त

Image
जलयुक्त शिवार यशोगाथा... खरीप हंगामातील उत्पन्नात भरघोस वाढ रब्बी हंगामातही मिळणार पिकांना आधार अभियानामुळे फायदा झाल्याने शेतकरी समाधानी राज्य शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे निर्माण झालेल्या संरक्षित पाणी साठ्यांमुळे वाशिम सारख्या कोरडवाहू जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही चांगला फायदा झाला आहे. रिसोड तालुक्यातील बाळखेड व मोठेगाव येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन व तुरीच्या पेरण्या आटोपल्यानंतर पावसाने सलग ४० ते ४१ दिवस पाठ फिरवली होती. या काळात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा वापर करूनच शेतकऱ्यांनी आपली पीके वाचविली. इतकेच नव्हे तर जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांमुळे सोयाबीन पिकाला पुरेसे पाणी मिळाल्यामुळे यंदा अधिक उत्पन्न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होत असून आपले शिवार जलयुक्त झाल्यामुळे हे शेतकरी चिंतामुक्त झाले असल्याचे दिसत आहेत. राज्य शासनाच्या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित पत्रकार दौऱ्याच्यानिमित्ताने बाळखेड व मोठेगावमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेली शेतीची कामे पाहण्याची संधी मिळाली.

शासनाच्या वर्षपुर्तीनिमित्त निमित्त घडीपुस्तिकेचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते प्रकाशन

Image
वाशिम :  विद्यमान राज्य शासनाच्या वर्षपुर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत निर्मित पुस्तिका ‘पहिले पाऊल वचनपूर्तीचे’, लोकराज्य मासिकाचा विशेषांक व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या दालनात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्र. अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी ए. आर. खंडागळे, प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, तात्या नवघरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक तानाजी घोलप, आकाशवाणीचे वार्ताहर सुनील कांबळे आदी उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या घडीपुस्तिकेमध्ये राज्य शासनाने गेल्या वर्षभरामध्ये राबविलेल्या योजनांची जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये जलयुक्त शिवार अभियान, पीक कर्ज पुनर्गठन, सावकारी कर्जमाफी, पीक कर्ज वाटप, शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुर

सततच्या भारनियमनाला पर्याय सौर कृषीपंपाचा

Image
वीज बिलापासून मिळणार कायमस्वरूपी सुटका शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के हिस्सा भरावा लागणार राज्य शासनाची शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना पारंपरिक वीज निर्मितीकरिता असणाऱ्या मर्यादा आणि वाढती मागणी यामुळे वीज भारनियमन करण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याने शेतीच्या सिंचनामध्ये अडथळे येतात. त्यामुळे विहिरीला पाणी असूनही केवळ विजेअभावी पिकांचे नुकसान झाल्याचे अनेक वेळा पाहायला मिळते. मात्र पारंपारिक वीज निर्मितीला असणाऱ्या मर्यादा व अशा प्रकारे वीज निर्मिती करताना होणारे प्रदूषण व हवामानावरील विपरीत परिणाम तसेच पारंपारिक वीज निर्मितीसाठी आवश्यक असणारी खनिज संपत्ती मर्यादित असल्याने सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक उर्जेचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे उर्जेचा एक अखंडित स्त्रोत उपलब्ध होणार आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषीपंपांचे वितरण करण्यात येत आहे. विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जात आहे. वाशिम जिल्ह्याचाही या योजनेमध्ये समावेश असून जिल्ह्याला

बाळखेडमध्ये जलयुक्त शिवार अभियानामुळे पिकांना मिळाला आधार

Image
बाळखेड येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान पत्रकार दौऱ्यामध्ये विविध कामांना भेटी वाशिम  : विद्यमान शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त बाळखेड (ता. रिसोड) येथे जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत झालेल्या कामांना भेटी देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार बांधवांनी कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेली शेततळी व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्य ‘आपलं गाव, आपलं पाणी’ प्रकल्पाला भेट दिली. यावेळी बाळखेड येथील ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानामुळे पिकांना आधार मिळाल्याचे सांगून या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक बलवंत गजभिये, तालुका कृषी अधिकारी आर. एच. तांबिले, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक तानाजी घोलप, कृषी पर्यवेक्षक श्री. इरतकर, कृषी सहाय्यक आशा वाघमारे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. श्री. तांबिले यांनी कृषी विभागामार्फत बनविण्यात आलेल्या शेततळ्याविषयी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, शेततळ्याच्या खोदकामासाठी शासनामार्फत १०० टक्के अनुदान दे
Image
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले लांडगे कुटुंबियांचे सांत्वन वाशिम , दि . १३ : राज्याच्या गृह (शहरे), सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मालेगाव  तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील आत्महत्या केलेल्या दत्ता लांडगे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी लांडगे कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या कुटुंबियांना उत्पन्नाचा शाश्वत स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार विजय जाधव, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी संदीप सानप, तहसीलदार सोनाली मेटकरी आदी उपस्थित होते. यावेळी दत्ता लांडगे यांचे वडील आत्माराम लांडगे, आई सत्यभामा व पत्नी सोनाली यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच दत्ता लांडगे यांच्या पत्राची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी केली. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, दत्ता लांडगे

तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार- जिल्हाधिकारी द्विवेदी

तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार- जिल्हाधिकारी द्विवेदी ·         अफवांना बळी न पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ·         जिल्ह्यातील २४ केंद्रांवर होणार परीक्षा ·         परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू वाशिम , दि . १० : जिल्हाधिकारी व अधिनस्त क्षेत्रीय आस्थापनेवरील तलाठी संवर्गाची लेखी परीक्षा दिनांक १३ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध २४ केंद्रांवर होत आहे. परीक्षा प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे होणार आहे. नोकरीस लावून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्यांपासून तसेच तोतयागिरीपासून परीक्षार्थींनी सावध रहावे. याबाबत कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करू नयेत, फसवणूक झाल्यास जिल्हा निवड समिती जबाबदार राहणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे. वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालय, राजस्थान आर्य कॉलेज, श्री. शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, श्रीमती मुलीबाई चरखा इंग्लिश स्कूल, हॅपी फेसेस इंग्लिश स्कूल, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, शासकीय तंत्र निकेतन, रेखाताई कन्या शाळा, मालतीबाई

कोयासन विद्यापीठात अभूतपूर्व उत्साहात पुतळ्याचे अनावरण

Image
कोयासन विद्यापीठात अभूतपूर्व उत्साहात पुतळ्याचे अनावरण डॉ. बाबासाहेबांना 125व्या जयंतीवर्षात लंडनपासून टोकियोपर्यंत वैश्विक मानवंदना मुंबई, दि. 10 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यंदा 125वे जयंती वर्ष साजरे करण्यात येत असतानाच त्यांना आज महाराष्ट्र शासनातर्फे सातासमुद्रापार झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून जणू वैश्विक मानवंदना देण्यात आली. जपानच्या कोयासन विद्यापीठात अपूर्व उत्साहात झालेल्या अनोख्या कार्यक्रमात बाबासाहेब ांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमं त्री देवेंद्र फडणवीस यां च्या हस्ते करण्यात आले . बाबासाहेबांचे वास्तव्य असलेली इंग्लंडमधील वास्तू खरेदीची प्रक्रिया मार्गी लावतानाच जपानमधील पुतळ्याच्या अनावरणातून राज्यघटनेच्या थोर शिल्पकाराच्या गौरवाचे एक चक्र जणू राज्य शासनाने पूर्ण केले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे यंदा डॉ. बाबासाहेबांचे 125वे जयंती वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे. या वर्षात इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाच्या उभारणीचा प्रश्न सरकारने मार्गी लावला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी बाबासाहेबांचे लंडनमधील वास्तव्य