कोयासन विद्यापीठात अभूतपूर्व उत्साहात पुतळ्याचे अनावरण
कोयासन विद्यापीठात अभूतपूर्व उत्साहात पुतळ्याचे
अनावरण
डॉ. बाबासाहेबांना
125व्या जयंतीवर्षात
लंडनपासून
टोकियोपर्यंत वैश्विक मानवंदना
मुंबई, दि. 10 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यंदा 125वे
जयंती वर्ष साजरे करण्यात येत असतानाच त्यांना आज महाराष्ट्र शासनातर्फे
सातासमुद्रापार झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून जणू वैश्विक
मानवंदना देण्यात आली. जपानच्या कोयासन विद्यापीठात अपूर्व उत्साहात
झालेल्या अनोख्या कार्यक्रमात बाबासाहेबांच्यापूर्णाकृती
पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते करण्यात
आले. बाबासाहेबांचे वास्तव्य असलेली इंग्लंडमधील वास्तू खरेदीची
प्रक्रिया मार्गी लावतानाच जपानमधील पुतळ्याच्या अनावरणातून राज्यघटनेच्या थोर
शिल्पकाराच्या गौरवाचे एक चक्र जणू राज्य शासनाने पूर्ण केले आहे.
महाराष्ट्र
शासनातर्फे यंदा डॉ. बाबासाहेबांचे 125वे जयंती वर्ष मोठ्या उत्साहात साजरे
करण्यात येत आहे. या वर्षात इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाच्या उभारणीचा प्रश्न
सरकारने मार्गी लावला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी बाबासाहेबांचे लंडनमधील
वास्तव्य असलेली वास्तू खरेदी करण्याची प्रक्रियाही गेल्याच आठवड्यात मार्गी लागली
आहे. या पाठोपाठ आज जपानमधील या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाने
बाबासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.
या अतिशय शानदार आणि भावपूर्ण सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले, डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांचा येथील पुतळामहाराष्ट्र आणि भारताच्या जनतेकडूनकोयासनआणि जपानच्या नागरिकांना दिलेली एक अमूल्य भेट आहे.
वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबूनिसाका, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई,
खासदार रामदास आठवले, खासदार अमर साबळे, माजी राज्यमंत्री सुलेखा
कुंभारे आदी यावेळीउपस्थित होते.
कोयासनआपल्यास्थापनेचे1200वे वर्ष साजरे करीतअसून
भारतासह जगभरात बाबासाहेबांचे 125 वे जयंती वर्ष साजरे होत आहे. या
पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे
औचित्य जुळून आले आहे, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेब जगातीलआघाडीच्या बुद्धिस्टनेत्यांपैकी एक होते. प्रख्यात विधिज्ञ, नेतेआणि समाजसुधारक अशी त्यांची जगभर ओळख होती. बुद्धधम्माचीतत्त्वे आणि शिकवण त्यांनी
आयुष्यभर जपली, त्यातून त्यांनी अनेकांचेआयुष्य समृद्ध केले.
बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी भारतीय समाज विषमताग्रस्त होता. मात्र
त्यांनी समतेच्या मुल्यांची आम्हास शिकवण दिली. समाजातील दुर्बल आणि उपेक्षित
घटकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ते आग्रही होते. त्यादृष्टीने त्यांनी भारतीय
राज्यघटनेत विविध बाबींची तरतूद केली. बाबासाहेबांनी जेथे बौद्ध धर्माचा स्वीकार
केला, त्याच नागपूर शहरातून मी आलो आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही
भावोत्कट उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. डॉ. आंबेडकरांचा पुतळा
उभारणीच्या कार्यात सहकार्य केल्याबद्दलवाकायामाचेगव्हर्नरनिसाकाआणित्यांच्यासहकाऱ्यांसह कोयासन मंदिर व्यवस्थापनआणिकोयासन विद्यापीठाचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
वाकायामाचेगव्हर्नरश्री. निसाकायावेळी म्हणाले,
जपानमधील कोयासनसारख्या बौद्धसंस्कृतीच्या सर्वाधिक प्राचीन अध्ययन केंद्रात
बाबासाहेबांचे स्मारक होणे ही बाब अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि गौरवास्पद आहे. येथील
बुद्धिस्ट सॅंक्च्युरीचे प्रवर्तक भंते कोबो डायशी यांनी भारतातील बौद्ध
परंपरांचा जपानला परिचय करून दिला. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी आधुनिक भारताला
पुन्हा बौद्ध तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली. जपानमधील पर्यटक भविष्यात अजिंठा,
वेरूळ या बौद्ध संस्कृतीच्या प्रमुख पर्यटन केंद्रांसह नागपूरची दीक्षाभूमी आणि
ड्रॅगन पॅलेसलाही मोठ्या प्रमाणात भेटी देतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोयासन विद्यापीठाचा परिसर आज सकाळपासूनच गजबजून गेला होता.
मुख्यमंत्र्यांसह या कार्यक्रमासाठी
आलेल्या सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र संस्कृतीचे प्रतीक
म्हणून उपस्थित पाहुण्यांसह जपानी नेत्यांनीही उत्साहात भगवे फेटे बांधले.
तुतारी वाजवून सर्वांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यास विद्यार्थी
मोठ्यासंख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण भारावलेले होते. यानिमित्ताने महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळातर्फे डॉ. आंबेडकरआणि बुद्धिझम याविषयावरील
सांस्कृतिक कार्यक्रमाचेआयोजन करण्यातआले. यात पोवाडे व लेझीम नृत्याचा समावेश होता.
याच
कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू
निसाका यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोसायन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य
करारकरण्यात आला.
या दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू यावेळी उपस्थित होते. या दोन्हीविद्यापीठांमध्येसंबंधअधिकवृद्धिंगतकरण्यावरयाकरारातूनभरदेण्यातआलाआहे.
दरम्यान
आज सकाळी वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका यांनी मुख्यमंत्र्यांचेस्वागत केले. त्यासोबत त्यांनी कोयासन येथे बौद्ध भिक्खूंसोबत
प्रार्थना करण्यासोबतच
1200 वर्षे जुन्या कोयासन सॅंक्च्युरी येथील बौद्ध भिक्खू कोबो डायशी यांच्या
पुतळ्याला तामागावा नदीचे शुद्ध जल अर्पण केले.
Comments
Post a Comment