Posts

Showing posts from 2023

अनसिंग येथे पोहचली विकसीत भारत संकल्प यात्रा ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
अनसिंग येथे पोहचली विकसीत भारत संकल्प यात्रा ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाशिम, दि. 28 (जिमाका)  :   भारताला सन 2047 पर्यंत विकसीत राष्ट्र म्हणून पुढे यायचे आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. ज्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा अद्यापही लाभ मिळालेला नाही, त्यांना योजनांची माहिती होवून ते लाभ घेण्यास प्रवृत्त होण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून विकसीत भारत संकल्प यात्रा देशभर काढण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज 28 डिसेंबर रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे गांधी चौकात विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माहितीसह लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या मुलाखती दाखविण्यात आल्या. अनसिंगचे सरपंच संतोष खंडारे, यात्रा समन्वयक चंद्रकांत ठाकरे यांनी या यात्रेचे स्वागत केले. यावेळी या यात्रेच्या माध्यमातून उपस्थित नागरीकांना केंद्र सरकारच्या विवि

बालविवाह होणार नाही यासाठी पालकांमध्ये जनजागृती करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा

Image
बालविवाह होणार नाही यासाठी पालकांमध्ये जनजागृती करा              जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा   वाशिम, दि. 27 (जिमाका)  :   मुलींसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांची माहिती मुलींसह त्याच्या पालकांना करुन द्यावी. जिल्हयात 18 वर्षाआतील एकाही मुलींचा बालविवाह होणार नाही यासाठी पालकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.        26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा आयोजित सभेत घेतांना अध्यक्षस्थानावरुन श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) संजय जोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा औषधी निर्माण असोशिएशनचे अध्यक्ष राजेश सिरसाठ, स्वयंसेवी संस्थेच्या सोनाली ठाकूर, डॉ. प्रेमलता आसावा, डॉ. अल्का मकासरे यांची प्रमुख उपस्थिती होती.        श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, कुटूंब नियो

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी एलईडी वाहनास दाखविला हिरवी झेंडा. 28 फेब्रुवारीपर्यंत अभियान

Image
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी एलईडी वाहनास दाखविला हिरवी झेंडा 28 फेब्रुवारीपर्यंत अभियान वाशिम दि.14 (जिमाका) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते आज 14 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती अभियानाच्या एलईडी वाहनास हिरवा झेंडा दाखूवन जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.        यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे,सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,नायब तहसीलदार सतिश काळे,जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक धर्मराज चव्हाण,तांत्रिक सहायक अजय बांडे यांचेसह इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.       सन 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या पारदर्शकतेबाबत जनजागृती करण्यासोबतच मतदानामध्ये मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी गावोगावी जाऊन 20 जानेवारी 2023 पर्यंत एलईडी वाहनाद्वारे ही जनजागृती केली जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5

दुधाळ जनावरांचा पुरवठा व शेळी गट वाटप योजना. 15 डिसेंबरपर्यंत पशुपालकांनी ऑनलाईन अर्ज करावे

Image
*दुधाळ जनावरांचा पुरवठा व शेळी गट वाटप योजना* 15 डिसेंबरपर्यंत पशुपालकांनी ऑनलाईन अर्ज करावे वाशिम,दि.12 (जिमाका) जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सन 2023-24 वर्षासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून 12 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.हे अर्ज https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर गुगल प्ले स्टोअरमध्ये AH.MAHABMS या मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.  अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जाणार आहे. लाभार्थ्यांची निवडसुध्दा ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात येणार आहे.अर्ज करण्याचा कालावधी वाढवून 15 डिसेंबर 2023 पर्यंत करण्यात आला आहे.  विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/नवबौध्द लाभार्थींना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा पुरवाठा करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांची निवड झाल्यास एक महिन्याच्या आत 25 टक्के लाभार्थी हिस्सा 44 हजार 814 रुपये धनाकर्षाव्दारे भरावा लागेल.निवड झालेल्या या योजनेत अनुदान प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना 2 दुधाळ जनावरे कृषी उत्पन्

दुकानाचे नामफलक मराठीत असणे आवश्यक : सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

Image
दुकानाचे नामफलक मराठीत असणे आवश्यक सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन वाशिम, दि. 12 (जिमाका)  :   प्रत्येक दुकानाचे नामफलक सुरुवातीला मराठीत नाव असणे आवश्यक आहे. अशा तरतुदीची महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियम अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमाच्या कलम 7 नुसार ज्या आस्थापनेत 10 पेक्षा कमी कामगार आहे,अशा सर्व आस्थापनांना कलम 36 क (1) कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेत 10 पेक्षा अधिक कामगार आहे अशा सर्व आस्थापनेचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असणे आवश्यक आहे. परंतू अशा आस्थापनेच्या नियोक्त्यांकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरीक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतात. परंतू मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरुवातील लिहीणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षराचा टंक (Font) आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षराचा टंक (Font) आकारापेक्षा लहान असणार नाही तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशी आस्थापना नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहीणार नाही. असा बद

अनसिंग प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर न झाल्यास मालमत्ता जप्तीची होणार कारवाई

Image
अनसिंग प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर न झाल्यास मालमत्ता जप्तीची होणार कारवाई वाशिम, दि. 12 (जिमाका)  :   पोलीस स्टेशन, मालेगाव येथे 8 सप्टेंबर 2023 रोजी फिर्यादीने फिर्याद देवून फिर्यादीची पुतणी/पिडीता ही 16 वर्षाची असून इयत्ता 11 वी मध्ये शिकत आहे. तिला आई नसून वडील व 3 बहिण भावासोबत राहते. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान पिडीता आरोपीचे चक्कीवर ठेवलेले दळण आणण्यासाठी गेली असता आरोपी गजानन घोळवे यांने फिर्यादीची पुतणी/पिडीता हिचा विनयभंग केल्याचा जबानी रिपोर्ट दिला. यातील आरोपी गजानन घोळवे वय 58 वर्षे रा, अनसिंग, ता. मालेगांव याचेविरुध्द पोलीस स्टेशन, मालेगांव येथे कलम 354 भा.दं.वि. सह कलम 12 अधिनियम सहकलम 3 ॲट्रॉसिटी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयातील आरोपी गजानन घोळवे हा घटनेच्या तारखेपासून फरार आहे. न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. आरोपी हा अटक टाळण्याकरीता फरार राहिल्याने आरोपीविरुध्द जिल्हा न्यायाधिश व अतिरिक्त सत्र न्यायाधिश, वाशिम यांचेकडून पकड वॉरंट काढण्यात आले होते. आरोपी आपली अटक टाळण्याकरीता फरार राहिल्याने

18 डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस

Image
18 डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस वाशिम, दि. 12 (जिमाका)  :   18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. अल्पसंख्यांक नागरीकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव/ माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी करण्यात येते. जिल्हयातील विविध शाळा/ महाविद्यालयांमध्ये समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्याकरीता भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीके देण्यात यावी. तसेच अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त चर्चासत्र, व्याख्यानमाला व परिसंवादाचे आयोजन देखील करण्यात यावे. तसेच राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मेळावे व चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे. असे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी कळविले आहे.  *******

प्रधानमंत्री आणि राज्यपालांचा विकसित भारत@२०४७ निमित्त कुलगुरूंशी संवाद ..विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Image
प्रधानमंत्री आणि राज्यपालांचा विकसित भारत @ २०४७ निमित्त कुलगुरूंशी संवाद विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे   -  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विकसित भारताच्या उभारणीसाठी विद्यापीठ ,  शैक्षणिक संस्थासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा -  राज्यपाल रमेश बैस मुंबई ,  दि. ११ : देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांच्या वैयक्तिक सहभागातूनच राष्ट्रउभारणी होते.  विकसित भारताच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी विकसित भारत या संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे ,  असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. विकसित भारत  @ २०४७च्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यपाल, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू ,  सार्वजनिक ,  खाजगी आणि अभिमत विद्यापीठांचे कुलगुरू ,  प्र कुलगुरू ,  कुलसचिव यांच्याशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. महाराष्ट्रात राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत @ २०४७ च्या संकल्पनांवर विचार-विमर्श करण्यासाठी राजभवन येथील दरबार हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्या

नोंदणीकृत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
नोंदणीकृत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Ø नमो महारोजगार मेळाव्यात 11097 उमेदवारांना नियुक्तीपत्रे Ø दोन दिवसांत 67378 उमेदवारांची नोंदणी ; 32831 मुलाखती Ø महाराष्ट्रात अन्य ठिकाणीसुध्दा नमो महारोजगार मेळावे  नागपूर, दि.१० : आजपर्यंत देशात अनेक राज्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळावा हा देशात अभुतपूर्व ठरला आहे. दोन दिवसीय या मेळाव्यात ६७ हजार ३७८ उमेदवारांनी नोंदणी केली असून यापैकी ११०९७ उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नोंदणी झालेल्या उर्वरीत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन परिसरात आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात

रोजगाराच्या नवक्षितिजांना तरुणांची साद..नमो महारोजगार मेळाव्यातून उघडली संधीची नवी कवाडे

Image
रोजगाराच्या नवक्षितिजांना तरुणांची साद नमो महारोजगार मेळाव्यातून उघडली संधीची नवी कवाडे नागपूर,दि.१० : तरूणांचा देश म्हणून जगात भारताची ओळख आहे. तरूणांची ऊर्जा देशसेवेसाठी लागण्यासोबतच त्यांच्या हाताला काम देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘नमो महारोजगार मेळाव्या’ तून झाले. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नागपूरात आयोजित या मेळाव्यात हजारो तरूण तरूणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्योग, आस्थापना व विविध क्षेत्रातील संधीमुळे तरूणांच्या भविष्याचे योग्य नियोजनाचे काम या माध्यमातून शासनाने केले आहे. या मेळाव्यात काहींना रोजगार तर काहींना त्यासाठी प्रशिक्षण मिळाले.   नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देवून त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी शासनाने आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला. येथे तरुणाईला रोजगारासह त्यांच्या क्षेत्रातील नवसंधी आणि भविष्यकालीन रोजगाराच्या व्याप्तीबाबतही माहिती मिळा

114 ग्रामपंचायतीत पोहोचली विकसित भारत संकल्प यात्रा.. 23 हजार 576 नागरिकांचा सहभाग

Image
114 ग्रामपंचायतीत पोहोचली विकसित भारत संकल्प यात्रा  23 हजार 576 नागरिकांचा सहभाग   20 हजार नागरिकांनी भरले विमा योजनेचे अर्ज 2820 नागरिकांनी केली क्षयरोग निदान तपासणी  4728 नागरिकांनी केला विकसित भारताचा संकल्प   174 लाभार्थ्यांनी दिली योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती  वाशिम दि 10 (जिमाका) केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना अद्यापही मिळालेला नाही,त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती " विकसित भारत संकल्प यात्रा" या मोहिमेच्या माध्यमातून पोहोचविण्यात येत आहे.योजनांच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास या यात्रेच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे.जिल्हयात या यात्रेला 23 नोव्हेंबरला 4 डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली.9 डिसेंबरपर्यंत 6 डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतीमध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली. आतापर्यंत 23 हजार 576 नागरिक या यात्रेत सहभागी झाले आहे.                जिल्ह्यातील एकूण 491 ग्रामपंचायतीपैकी 114 ग्रामपंचायतीत केंद्

संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराजांच्या मंदिराचे निर्माण अयोध्येतील मंदिराच्या धर्तीवर होणार पालकमंत्री संजय राठोड. संत रामराव महाराज मंदिराची पायाभरणी

Image
संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराजांच्या मंदिराचे निर्माण अयोध्येतील मंदिराच्या धर्तीवर होणार                      पालकमंत्री संजय राठोड संत रामराव महाराज मंदिराची पायाभरणी वाशिम दि.10 (जिमाका) पोहरादेवी येथे उभारण्यात येणारे संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांचे समाधी मंदिर अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर उभे राहणार असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.                 आज 10 डिसेंबर रोजी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे संत रामराव महाराज मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री.राठोड बोलत होते. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,बंजारा समाजाचे धर्मगुरु बाबुसिंग महाराज,जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, देविभक्त कबीरदास महाराज, शेखर महाराज,जितेंद्र महाराज,अनिल राठोड,संजय महाराज,तेलंगणाचे आमदार अनिल जाधव,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ संजय रोठे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव,पोहरादेवी सरपंच विनोद राठोड,वसंतनगर सरपंच गणेश जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.            पालकमंत्री

नवभारत साक्षरता कार्यक्रम *5326 निरक्षर होणार पायाभूत व डीजिटल साक्षर*

Image
नवभारत साक्षरता कार्यक्रम  *5326 निरक्षर होणार पायाभूत व डीजिटल साक्षर*  वाशिम दि.10(जिमाका) पूर्वी केवळ लिहिता व वाचता येणे म्हणजेच साक्षर.ही साक्षरतेची व्याख्या काळानुरूप बदलून गेली आहे.आता प्रौढ शिक्षणावरील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार यात बदल झाला आहे.नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 5326 निरक्षरांना आता लिहिता वाचता येण्यासोबतच पायाभूत डिजिटल साक्षर करण्यात येणार आहे,ते सुद्धा त्यांच्या सवडीने.          पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींना संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येय्यानुसार सन 2030 पर्यंत सर्व तरुण,प्रौढ पुरुष आणि स्त्रिया यांना संख्याज्ञानाची माहिती होणार आहे. या निरक्षरांना पायाभूत साक्षर करून त्यांना वाचन व लेखन शिकून त्यांचे संख्याज्ञान विकसित करण्यात येणार आहे.                 जिल्ह्यातील निरक्षरांना नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत साक्षर करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची सभा नुकतीच निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.या सभेला जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प

लोक न्यायालयात एकाच दिवशी १ हजार १८९ प्रकरणे निकाली..लोक न्यायालयाने फुलला पती पत्नीचा संसार..४ कोटी ६१ लक्ष १० हजार ९१८‌ रक्कमेची प्रकरणे निकाली

Image
लोक न्यायालयात एकाच दिवशी १ हजार १८९ प्रकरणे निकाली लोक न्यायालयाने फुलला पती पत्नीचा संसार ४ कोटी ६१ लक्ष १० हजार ९१८‌ रक्कमेची प्रकरणे निकाली              वाशिम,दि.९ (जिमाका) आज शनिवार ९ डिसेंबर रोजी जिल्हयातील सर्व तालुका व जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व्ही.ए.टेकवाणी यांनी ज्या पक्षकारांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत तसेच दाखल पुर्व प्रकरणे असलेल्या पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटविण्याकरीता लोक न्यायालयामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते.         आज आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एका दिवसात वाशिम जिल्हयामधील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकुण १ हजार ६ प्रकरणांचा तसेच दाखल पुर्व १८३ प्रकरणे असे एकुण १ हजार १८९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व एकुण रुपये ४ कोटी ६१ लक्ष १० हजार ९१८‌ रक्कमेचे प्रकरणे निकाली काढण्यात आली.राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यामध्ये वकील संघाच

नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा नमो महारोजगार मेळावा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Ø राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे थाटात उद्घाटन. Ø हजारो उमेदवारांना नियुक्ती मिळण्याची शक्यता. Ø उद्या सायंकाळी 5 वाजता शानदार समारोह

Image
नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा नमो महारोजगार मेळावा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Ø राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे थाटात उद्घाटन Ø हजारो उमेदवारांना नियुक्ती मिळण्याची शक्यता Ø उद्या सायंकाळी 5 वाजता शानदार समारोह           नागपूर/ वाशिम दि.9 (जिमाका) : नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात होत असलेला आजचा नमो महारोजगार मेळावा जागतिक दर्जाचा आहे. हा मेळावा रोजगार देणारे आणि घेणारे यांचे संयुक्त व्यासपीठ असून बेरोजगारी मुक्त नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा हा मेळावा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.             राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 9 व 10 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. सकाळी 11 वाजता या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दटके, प्रसा

महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी. विकसित भारत संकल्प यात्रेपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध                                    प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी विकसित भारत संकल्प यात्रेपासून कोणीही वंचित राहणार नाही                                                                   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे           मुंबई/वाशिम दि. 9 (जिमाका) : भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात, त्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.         राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहोचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. या यात्रेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांच्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 29 मार्चपर्यंत अर्ज ऑनलाईनची मुदत

Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 29 मार्चपर्यंत अर्ज ऑनलाईनची मुदत वाशिम, दि. 08 (जिमाका)  :   सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या/ शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबोध्द विद्यार्थ्यापैकी इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी आणि पदवीनंतरच्या विविध स्तरावरील व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांमध्ये महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुला- मुलींप्रमाणे भोजन, निवास शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी शासन निर्णयामध्ये नमुद केल्याप्रमाणे रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 पासून सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेबाबत निकष पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असाव

जि.प.पदभरती 2019 रद्द : परीक्षा शुल्क उमेदवारांच्या बँक खात्यात जमा

Image
जि.प.पदभरती 2019 रद्द परीक्षा शुल्क उमेदवारांच्या बँक खात्यात जमा वाशिम, दि. 08 (जिमाका)  :   जिल्हा परिषद पदभरती 2019 रद्द झाल्यामुळे या पदभरतीमध्ये जिल्हयासाठी विविध पदांकरीता अर्ज केलेल्या व बँक खात्यांची माहिती भरलेल्या 3 हजार 123 उमेदवारापैकी पडताळणी केलेल्या 2 हजार 785 उमेदवारांचे परीक्षा शुल्क रक्कम 8 लक्ष 16 हजार 250 रुपये संबंधित उमेदवाराच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी यादीसह धनादेश भारतीय स्टेट बँक शाखा, वाशिम येथे पाठविण्यात आले आहे. तरी संबंधित उमेदवारांनी परीक्षा शुल्क रक्कम आपल्या बँक खात्यात जमा झाल्याची खात्री करुन घ्यावी. असे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा उप मुख कार्यकारी अधिकारी (सा.), जिल्हा परिषद वाशिम यांनी कळविले आहे. *******

विशेष सहाय्य योजना 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

Image
विशेष सहाय्य योजना 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले वाशिम, दि. 08 (जिमाका)  :   विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. यामध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावे. या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत संबंधित सेतू संचालक व नागरीकांनी नोंद घ्यावी. असे तहसिलदार, वाशिम यांनी कळविले आहे. *******

विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   नागपूर, दि. 7 : समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभा‍वीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरीकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी रामगिरी येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबत विस्ताराने सुचना दिल्या. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्यासह विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधा

जिल्हाधिकाऱ्यांनी केला ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ• उत्कृष्ट संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव• सैनिकी कविता संग्रहाचे प्रकाशन• महिला बचतगटांना धनादेश वाटप

Image
जिल्हाधिकाऱ्यांनी केला ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ •   उत्कृष्ट संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव • सैनिकी कविता संग्रहाचे प्रकाशन • महिला बचतगटांना धनादेश वाटप वाशिम,दि.07 (जिमाका) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने आयोजित केलेल्या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते आज 7 डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे,निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ घुगे, यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा सुपखेलाचे कमाडेंट कर्नल प्रविण ठाकरे,वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,कारंजा उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे व प्रा.डॉ. विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शहिदांच्या स्मृतीचिन्हास श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी मान्यवरांसह सभागृहात उपस्थित असलेल्या व्यक्तींनी जागेवर उभे राहून शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली.  जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांन

9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे महारोजगार मेळावा जिल्हयातील जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे आवाहन

Image
9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे महारोजगार मेळावा जिल्हयातील जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे आवाहन वाशिम, दि. 07 (जिमाका)  :   तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार देण्याचे काम कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशाप्रमाणे 9 व 10 डिसेंबर 2023 या दोन दिवशीय “नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे” आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे. राज्यभरातून विविध क्षेत्रातील किमान 1 हजार कंपन्या या महारोजगार मेळाव्यात प्राधान्याने सहभागी होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील ज्या कंपन्या, उद्योजकता व आस्थापनांकडे कुशल मनुष्यबळाची गरज असेल अशा सर्व आस्थापनांनी या महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन आस्थापनेवर असणाऱ्या रिक्तपदांबाबतची माहि