स्पार्क माविमची मालेगावात दिव्यांग रॅली उत्साहात जागतिक दिव्यांग दिनानिमित्तविविध स्पर्धाचे आयोजन
स्पार्क माविमची
मालेगावात दिव्यांग रॅली उत्साहात
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त
विविध स्पर्धाचे आयोजन
वाशिम दि.०३ (जिमाका) जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन महिला आर्थिक विकास महामंडळ लोकसंचालित साधन केंद्र मालेगावच्या वतीने स्पार्क प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवाची रॅली आज ३ डिसेंबर रोजी मालेगावच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली.
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माविमच्या वतीने देशातील प्रथमतः राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठी स्पार्क प्रकल्प मागील वर्षीपासून कार्यान्वित करण्यात आला आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध प्रशिक्षण ' शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य डीआयएफच्या माध्यमातून करण्यात येत आहे.स्पार्क माविम वाशीमच्या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव १ व २ च्यावतीने ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्य रांगोळी स्पर्धा व प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले.सकाळच्या सत्रामध्ये दिव्यांगासाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.सकाळी ११ वाजता लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव २ कार्यालय जुनी पंचायत समिती इमारत येथुन दिव्यांग दिनानिमित्य प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली.
रॅलीचा शुभारंभ माविम वाशीमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांनी हिरवा झेंडा दाखवुन केले. यावेळी त्यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.माविम स्पार्क दिव्यांगासाठी काम करीत असुन प्रत्येक दिव्यांगाना त्यांचा हक्क मिळवुन देण्यासाठी माविम कटीबद्ध असल्याचे सांगुन सर्वांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पीएसआय श्री.इंगळे यांनी मार्गदर्शन केले.व्यवस्थापक प्रा.शरद कांबळे व लता इंगळे यांच्या नेतृत्वात मालेगाव शहरातील प्रमुख मार्गानी दिव्यांग बांधवाची रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप लोकसंचालीत साधन केंद्र मालेगाव २ कार्यालयात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीता गायकवाड होत्या.यावेळी रांगोळी स्पर्धा विजेते आकाश सावळे - प्रथम, किरण गायकवाड - द्वितीय,शितल सरकटे - तृतीय व रेखा कांबळे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी दिव्यांगासाठी उत्कृष्ट कार्य करणारे विजय सावळे यांचा सत्कार करण्यात आला.रॅली व कार्यक्रमाला १०० च्यावर दिव्यांग बंधू भगीनीची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डीआयएफ राधिका भोयर,अमोल जाधव, सहयोगीनी पुष्पा गवळी,सुनीता सुर्वे ' भारती चक्रनारायण यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे संचालन लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक प्रा.शरद कांबळे यांनी केले.आभार व्यवस्थापक लता इंगळे यांनी मानले. दिव्यांग रॅलीसाठी पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री इंगळे,श्री.कोकाटे, श्री.वानखडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment