सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे ६ डिसेंबरला जिल्हा दौऱ्यावर


सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे ६ डिसेंबरला जिल्हा दौऱ्यावर

वाशिम,दि.०५(जिमाका) सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे हे ६ डिसेंबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शासकीय वाहनाने मालेगांव(जि.नाशिक) येथून चाळीसगांव-कन्नड मार्गे समृध्दी महामार्ग वेरुळ इंटरचेंज (छत्रपती संभाजीनगर) कडे प्रयाण.सकाळी १०.३० वाजता समृध्दी महामार्ग वेरुळ इंटरचेंज येथे आगमन व समृध्दी महामार्गाची पाहणी करत शासकीय वाहनाने मालेगांव इंटरचेंज (जि. वाशिम) कडे प्रयाण.दुपारी १२.३० वाजता समृध्दी महामार्ग इंटरचेंज (जि. वाशिम) येथे आगमन व समृध्दी महामार्गाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी २ वाजता शासकीय वाहनाने समृध्दी महामार्ग मालेगांव इंटरचेंज (जि. वाशिम) येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
                    *******

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित