अनसिंग प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर न झाल्यास मालमत्ता जप्तीची होणार कारवाई




अनसिंग प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर न झाल्यास

मालमत्ता जप्तीची होणार कारवाई

वाशिम, दि. 12 (जिमाका)  पोलीस स्टेशन, मालेगाव येथे 8 सप्टेंबर 2023 रोजी फिर्यादीने फिर्याद देवून फिर्यादीची पुतणी/पिडीता ही 16 वर्षाची असून इयत्ता 11 वी मध्ये शिकत आहे. तिला आई नसून वडील व 3 बहिण भावासोबत राहते. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान पिडीता आरोपीचे चक्कीवर ठेवलेले दळण आणण्यासाठी गेली असता आरोपी गजानन घोळवे यांने फिर्यादीची पुतणी/पिडीता हिचा विनयभंग केल्याचा जबानी रिपोर्ट दिला. यातील आरोपी गजानन घोळवे वय 58 वर्षे रा, अनसिंग, ता. मालेगांव याचेविरुध्द पोलीस स्टेशन, मालेगांव येथे कलम 354 भा.दं.वि. सह कलम 12 अधिनियम सहकलम 3 ॲट्रॉसिटी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्हयातील आरोपी गजानन घोळवे हा घटनेच्या तारखेपासून फरार आहे. न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. आरोपी हा अटक टाळण्याकरीता फरार राहिल्याने आरोपीविरुध्द जिल्हा न्यायाधिश व अतिरिक्त सत्र न्यायाधिश, वाशिम यांचेकडून पकड वॉरंट काढण्यात आले होते. आरोपी आपली अटक टाळण्याकरीता फरार राहिल्याने पकड वारंटची बजावणी होवू शकली नाही. आरोपी हा गुन्हयात फरार झाल्याने व वॉरंटची बजावणी चूकविण्यासाठी गुप्तपणे वावरत असल्याने वाशिम न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीला कलम 82 सीआरपीसी अन्वये व्यक्तीश: न्यायालयासमोर 30 डिसेंबरपर्यंत हजर राहण्याबाबत फर्माविण्यात आले आहे. गुन्हयातील आरोपी न्यायालयासमोर हजर न झाल्यास त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई होऊ शकते. या गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम सुनिलकुमार पुजारी करीत असून जिल्हा न्यायालयात सरकारी वकिल अभिजीत व्यवहारे काम पाहत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांनी दिली.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश