६ डिसेंबर रोजी निवडणूक प्रस्तावाचे त्रृटी पुर्तता विशेष मोहिम
६ डिसेंबर रोजी निवडणूक प्रस्तावाचे त्रृटी पुर्तता विशेष मोहिम
वाशिम,दि.०४ (जिमाका) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिमच्या वतीने ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली (सुर्वे) रोड, वाशिम येथे ९४ निवडणूक प्रस्तावाचे त्रृटी पुर्तता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीरास उमेदवारांनी उपस्थित रहावे.असे आवाहन अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी,उपायुक्त तथा सदस्य व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिम यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment