9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे महारोजगार मेळावा जिल्हयातील जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे आवाहन




9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे महारोजगार मेळावा

जिल्हयातील जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभाग नोंदवावा

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे आवाहन

वाशिम, दि. 07 (जिमाका)  तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार देण्याचे काम कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशाप्रमाणे 9 व 10 डिसेंबर 2023 या दोन दिवशीय “नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे” आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे. राज्यभरातून विविध क्षेत्रातील किमान 1 हजार कंपन्या या महारोजगार मेळाव्यात प्राधान्याने सहभागी होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील ज्या कंपन्या, उद्योजकता व आस्थापनांकडे कुशल मनुष्यबळाची गरज असेल अशा सर्व आस्थापनांनी या महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन आस्थापनेवर असणाऱ्या रिक्तपदांबाबतची माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन सादर करावी. जेणेकरुन आस्थापना व कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची मागणी तातडीने पुर्ण होण्यास मदत होऊन जिल्हयातील बेरोजगार तरुण/तरुणींना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील.

नोकरी इच्छुक उमेदवारांना पुढीलप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करुन मेळाव्यात प्रत्यक्षपणे सहभागी होता येईल. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी. Employment  या टॅबवरील Job Seeker (Find a Job) हा पर्याय निवडून आपला सेवायोजन नोंदणी क्रमांक/आधार क्रमांक व पासवर्डने Sign in करावे. आपल्या होम पेजवरील Pandit Dindayal Upadhyah Job Fair पर्याय निवडावे. Washim जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी NAMO MEGA JOB FAIR या ओळीतील मेनूतील दुसऱ्या बटनावर क्लिक करावे. I Agree हा पर्याय निवडावा. पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या कंपन्यांच्या रिक्तपदांना Apply बटनावर क्लिक करावे. शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल. याबाबत अधिक माहितीची आवश्यकता असल्यास किंवा उद्योजकांची नोंदणी करतांना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण असल्यास कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या (07252-231494) या दूरध्वनी क्रमांकावर किंवा दिपक भोळसे (9764794037/7775814153) या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.

या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीच्या सदस्य सचिव, बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश