जि.प.पदभरती 2019 रद्द : परीक्षा शुल्क उमेदवारांच्या बँक खात्यात जमा
- Get link
- X
- Other Apps
जि.प.पदभरती 2019 रद्द
परीक्षा शुल्क उमेदवारांच्या बँक खात्यात जमा
वाशिम, दि. 08 (जिमाका) : जिल्हा परिषद पदभरती 2019 रद्द झाल्यामुळे या पदभरतीमध्ये जिल्हयासाठी विविध पदांकरीता अर्ज केलेल्या व बँक खात्यांची माहिती भरलेल्या 3 हजार 123 उमेदवारापैकी पडताळणी केलेल्या 2 हजार 785 उमेदवारांचे परीक्षा शुल्क रक्कम 8 लक्ष 16 हजार 250 रुपये संबंधित उमेदवाराच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी यादीसह धनादेश भारतीय स्टेट बँक शाखा, वाशिम येथे पाठविण्यात आले आहे. तरी संबंधित उमेदवारांनी परीक्षा शुल्क रक्कम आपल्या बँक खात्यात जमा झाल्याची खात्री करुन घ्यावी. असे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा उप मुख कार्यकारी अधिकारी (सा.), जिल्हा परिषद वाशिम यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment