अनसिंग येथे पोहचली विकसीत भारत संकल्प यात्रा ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- Get link
- X
- Other Apps
अनसिंग येथे पोहचली
विकसीत भारत संकल्प यात्रा
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशिम, दि. 28 (जिमाका) : भारताला सन 2047 पर्यंत विकसीत राष्ट्र म्हणून पुढे यायचे आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. ज्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा अद्यापही लाभ मिळालेला नाही, त्यांना योजनांची माहिती होवून ते लाभ घेण्यास प्रवृत्त होण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून विकसीत भारत संकल्प यात्रा देशभर काढण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज 28 डिसेंबर रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे गांधी चौकात विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माहितीसह लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या मुलाखती दाखविण्यात आल्या.
अनसिंगचे सरपंच संतोष खंडारे, यात्रा समन्वयक चंद्रकांत ठाकरे यांनी या यात्रेचे स्वागत केले. यावेळी या यात्रेच्या माध्यमातून उपस्थित नागरीकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आभाकार्ड व आयुष्मान कार्डचे वितरणही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. याठिकाणी अल्पसंख्यांक समाजातील बहुतांश महिला व नागरीक यांची लक्षणीय उपस्थिती होती.
कृषी सहायक सुनिल गोटे यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. अनसिंग येथील 8 शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून बचतगटातील शेतकरी समृध्द होत असल्याचे श्री. गोटे यांनी यावेळी सांगीतले. ग्रामसेवक श्यामलाल बरडीया यांनी अनसिंग येथे उमेदअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाचे 98 महिला बचतगट कार्यरत असून प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत 160 घरे, रमाई घरकुल योजनेअंतर्गत 14 घरे आणि मोदी घरकुल योजनेअंतर्गत 98 घरकुलाचे काम पुर्ण झाल्याची माहिती यावेळी दिली.
अनसिंग येथील विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, विकसीत भारत संकल्प यात्रेचे नोडल अधिकारी गजानन माळेकर व तालुका कृषी अधिकारी श्री. जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment