परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करा कृषी विभागाचे आवाहन
परवानाधारक विक्रेत्यांकडूनच
खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करा
कृषी विभागाचे आवाहन
वाशिम,दि.०१(जिमाका) जिल्हयात खताची व किटकनाशकांची गावोगावी जाऊन एजंटामार्फत फिरत्या वाहनातून विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी अशाप्रकारच्या विना परवाना विक्री करणाऱ्या एजंटकडून खते,बियाणे व किटकनाशके खरेदी करु नये.तसेच या प्रकाराबाबत तात्काळ नजीकच्या कृषी अधिकारी, पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे माहिती दयावी. जेणेकरुन संबंधित अवैध विक्री करणाऱ्या एजंटवर कायदेशीर कारवाई करता येईल.तसेच खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करावयाचे असल्यास परवानाधारक विक्रेत्याकडूनच पक्के बिल घेऊनच खरेदी करावी.अधिकतम विक्री मुल्यापेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास तात्काळ नजीकच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment