114 ग्रामपंचायतीत पोहोचली विकसित भारत संकल्प यात्रा.. 23 हजार 576 नागरिकांचा सहभाग
114 ग्रामपंचायतीत पोहोचली विकसित भारत संकल्प यात्रा
23 हजार 576 नागरिकांचा सहभाग
20 हजार नागरिकांनी भरले विमा योजनेचे अर्ज
2820 नागरिकांनी केली क्षयरोग निदान तपासणी
4728 नागरिकांनी केला विकसित भारताचा संकल्प
174 लाभार्थ्यांनी दिली योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती
वाशिम दि 10 (जिमाका) केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना अद्यापही मिळालेला नाही,त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती " विकसित भारत संकल्प यात्रा" या मोहिमेच्या माध्यमातून पोहोचविण्यात येत आहे.योजनांच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास या यात्रेच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे.जिल्हयात या यात्रेला 23 नोव्हेंबरला 4 डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली.9 डिसेंबरपर्यंत 6 डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतीमध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली. आतापर्यंत 23 हजार 576 नागरिक या यात्रेत सहभागी झाले आहे.
जिल्ह्यातील एकूण 491 ग्रामपंचायतीपैकी 114 ग्रामपंचायतीत केंद्राच्या योजनांची माहिती या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देण्यात आली. केंद्राच्या विविध योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची ध्वनीचित्रफित यावेळी दाखविण्यात आली.जिल्ह्यात या यात्रेदरम्यान 174 लाभार्थ्यांनी देखील केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाल्याचे समाधान " मेरी कहानी मेरी जुबानी " या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केले.
जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतीत विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली.या यात्रेचा लाभ 23 हजार 576 नागरिकांनी घेतला.त्यामध्ये 13 हजार 65 पुरुष आणि 13 हजार 695 स्त्रियांचा समावेश आहे.मतदान प्रक्रीयेबाबतचे ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक या यात्रेदरम्यान मंगरुळपिर तालुक्यातील 31,मानोरा तालुक्यातील 32 आणि वाशिम तालुक्यातील 32 नागरिकांनी संबंधित गावात यात्रेदरम्यान बघितले सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी 671 आणि जीवन ज्योति विमा योजनेसाठी 19 हजार 920 नागरिकांनी अर्ज भरून दिले.
नागरिकांची यात्रेदरम्यान आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब,मधुमेह तसेच क्षयरोग निदान व सिकलसेल चाचणी करण्यात आली.यावेळी क्षयरोग निदान तपासणी 2820 आणि सिकलसेल चाचणी 3028 नागरिकांनी केली.यावेळी 244 महिलांना आणि 382 विद्यार्थ्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन विकसित भारताचा संकल्प 4726 नागरिकांनी यात्रेदरम्यान केला.केंद्राच्या विविध योजनांचा लाभ आपल्यालाही मिळाल्याचे मनोगत या यात्रेदरम्यान यात्रा गावात पोहोचल्यानंतर 174 लाभार्थ्यांनी " मेरी कहाणी मेरी जुबानी " कार्यक्रमातून व्यक्त केले.या यात्रेमुळे केंद्र सरकारच्या विविध योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.लाभार्थ्यांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभामुळे सन 2047 पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र म्हणून पुढे येणार आहे.
Comments
Post a Comment