18 डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस


18 डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस

वाशिम, दि. 12 (जिमाका)  18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. अल्पसंख्यांक नागरीकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव/ माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी करण्यात येते. जिल्हयातील विविध शाळा/ महाविद्यालयांमध्ये समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्याकरीता भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीके देण्यात यावी. तसेच अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त चर्चासत्र, व्याख्यानमाला व परिसंवादाचे आयोजन देखील करण्यात यावे. तसेच राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मेळावे व चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे. असे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी कळविले आहे. 

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश