३ डिसेंबर रोजी आंतराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रम
३ डिसेंबर रोजी आंतराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रम
वाशिम,दि.२ (जिमाका) ३ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो.या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
३ डिसेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद व सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण यांच्या संयुक्त वतीने सामाजिक न्याय भवन, चिखली रोड,वाशिम येथे दुपारी १२ वाजता दिव्यांग बांधवाकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांच्या विविध योजना व दिव्यांगांकरिता कायदेविषयक माहिती देण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद आणि समाजकल्याण विभागाने केले आले.
Comments
Post a Comment