पालकमंत्री संजय राठोड २ डिसेंबर रोजी जिल्हयात
पालकमंत्री संजय राठोड
२ डिसेंबर रोजी जिल्हयात
वाशिम,दि.०१ (जिमाका) पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे २ डिसेंबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह,वाशिम येथे आगमन.सकाळी ११.१५ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवनकडे प्रयाण.सकाळी ११.२० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह परिसर येथे आगमन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सर्वसाधारण योजनांवर आधारीत तयार केलेल्या विकासरथ या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करतील.सकाळी ११.३० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेला उपस्थित राहतील.सभेनंतर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी ४ वाजता मंगरुळपीर, कारंजामार्गे मोटारीने दारव्हाकडे प्रयाण करतील.
*******
Comments
Post a Comment