विशेष सहाय्य योजना 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले


विशेष सहाय्य योजना

15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

वाशिम, दि. 08 (जिमाका)  विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. यामध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावे. या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत संबंधित सेतू संचालक व नागरीकांनी नोंद घ्यावी. असे तहसिलदार, वाशिम यांनी कळविले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर