काटा रोड आणि वाशिम स्टेशन रोड ते कोंढाळा (झामरे) दरम्यान ट्रस्ट बेड आणि ड्रेनेजच्या बांधकामामुळे वाहतुक मार्गात बदल*
*काटा रोड आणि वाशिम स्टेशन रोड ते कोंढाळा (झामरे) दरम्यान ट्रस्ट बेड आणि ड्रेनेजच्या बांधकामामुळे वाहतुक मार्गात बदल*
वाशिम,दि.०५ (जिमाका) सहायक मंडळ अभियंता,दक्षिण मंडळ रेल्वे, अकोला यांच्या २३ नोव्हेंबरच्या पत्रानुसार काटा रोड आणि वाशिम स्टेशन रोड वाशिम ते कोंढाळा दरम्यान केएम, ८१३/५-६ येथे मानवयुक्त लेव्हल क्रॉसींग गेट क्र. १११ हे ट्रस्ट बेड आणि ड्रेनेज (RUB) च्या बांधकामाकरीता १ डिसेंबर ते हे काम पुर्ण होईपर्यंत बंद करण्याबाबत विनंती केली आहे.
त्यानुसार काटा रोड आणि वाशिम स्टेशन रोड वाशिम ते कोंढाळा (झामरे) दरम्यान केएम, ८१३/५-६ येथे ट्रस्ट बेड आणि ड्रेनेज (RUB) च्या बांधकामाचे काम पुर्ण होईपर्यंत वाशिम स्टेशन वाशिम ते कोंढाळा (झामरे) दरम्यान केएम,८१३/५-६ येथील गेट क्र.१११ येथील वाहतूक पुर्णपणे ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून बंद करुन पुढील आदेशापर्यंत वाहतूकीकरीता पर्यायी मार्ग RUB at km, ८१२/१-२ (RUB No. ८१२/१A) सुरु करण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment