ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी एलईडी वाहनास दाखविला हिरवी झेंडा. 28 फेब्रुवारीपर्यंत अभियान
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती अभियानाचा शुभारंभ
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी एलईडी वाहनास दाखविला हिरवी झेंडा
28 फेब्रुवारीपर्यंत अभियान
वाशिम दि.14 (जिमाका) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते आज 14 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती अभियानाच्या एलईडी वाहनास हिरवा झेंडा दाखूवन जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे,सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,नायब तहसीलदार सतिश काळे,जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक धर्मराज चव्हाण,तांत्रिक सहायक अजय बांडे यांचेसह इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सन 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या पारदर्शकतेबाबत जनजागृती करण्यासोबतच मतदानामध्ये मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी गावोगावी जाऊन 20 जानेवारी 2023 पर्यंत एलईडी वाहनाद्वारे ही जनजागृती केली जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत प्रत्येक गावी जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या तज्ज्ञांद्वारे ही जनजागृती करुन मतदारांचे प्रश्न व त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यात येणार आहे.
*****
Comments
Post a Comment