Posts

Showing posts from April, 2021

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’

Image
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटे चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले. चाचणी कोणी करावी ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात. अशी करावी चाचणी ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चा

कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन खाजगी प्रवासी बस घेतल्या ताब्यात

Image
  ·          वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कारवाई वाशिम ,   दि. १९ (जिमाका) :   जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक कारणासाठीच नागरिकांना घराबाहेर परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रवासी वाहतुकीसाठी सुद्धा नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खाजगी प्रवासी बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होते, तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या व्हाटसअप क्रमांकावर प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अकोला-शेलूबाजार मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन खाजगी बस उप प्रादेशिक परिवहन विभागाने १८ एप्रिल रोजी ताब्यात घेतल्या आहेत. संचारबंदी काळात वैध कारणासाठी प्रवासी वाहतूक सुरु राहणार असून ऑटोरिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी , टॅक्सीमध्ये (चारचाकी) चालक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी , बसमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या क्षमतेएवढे प्रवासी घेण्यास मुभा आहे , मात्र उभा राहून प्रवास करण्यास मनाई आहे. प्रवासादरम्