Posts

Showing posts from July, 2023

केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत होणार औषधी वनस्पतींचे संवर्धन,विकास व शाश्वत व्यवस्थापन..लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Image
केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत होणार  औषधी वनस्पसतींचे संवर्धन,विकास व शाश्वत व्यवस्थापन लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन वाशिम,दि.31(जिमाका) राज्यात राष्ट्रीय वनस्पती मंडळ,नवी दिल्ली  यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार केंद्र पुरस्कृत योजना -औषधी वनस्पतींचे संवर्धन,विकास व शाश्वत व्यवस्थापन ही योजना राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत दर्जेदार लागवड साहित्य,आयईसी उपक्रम, काढणीपश्चात व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता चाचणी आणि प्रमाणन या घटकांचा समावेश आहे.योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यात आहेत.योजनेच्याा मार्गदर्शक सूचनांमध्ये् “Forward and backward linkage in supply chain of medicinal plants (Integrated component)” हा घटक नव्यााने समाविष्ट करण्यात आला आहे.ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत आहे. औषधी वनस्प्तींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन अंतर्गत विविध घटकांकरीता देण्यात येणारे अनुदान पुढीलप्रमाणे आहे. दर्जेदार लागवड साहित्यासाठी पायाभूत सुविधा (लागवड साहित्यायचे उत्पा दन) - सार्वजनिक क्षेत्रात बियाने/जनुक केंद्रांची स्थापना ४ हेक्टरसाठी,मापदंड

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मद्यविक्री दुकाने बंद राहणार

Image
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मद्यविक्री दुकाने बंद राहणार          वाशिम,दि.31(जिमाका) जिल्हयात 1 ऑगस्ट 2023 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.वाशिम शहर व रिसोड शहरात मोठया प्रमाणात मिरवणुका काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये मोठया संख्येने लोकांचा सहभाग राहणार आहे.जिल्हयात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी.हा उत्सव शांततेने पार पडावा.कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीकोणातून मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) नुसार 1 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण दिवस संपूर्ण वाशिम व रिसोड शहरातील मद्यविक्रीची परवाना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले आहे.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकाच्या नावे असलेला परवाना मुंबई दारुबंदी कायद्याअंतर्गत रद्द करण्यात येईल. असेही या आदेशात नमूद केले आहे.                      *******

प्रधानमंत्री पिक विमा योजना : ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Image
प्रधानमंत्री पिक विमा योजना ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ  वाशिम,दि.३१ (जिमाका) जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना २६ जुन २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ करीता लागु करण्यात आली आहे.या योजनेतंर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी १ रुपयात पिक विमा काढुन ३१ जुलै २०२३ या अंतिम मुदतीत सहभाग नोंदवू शकणार होते. परंतू ३१ जुलै अखेर जिल्हकयातील काही शेतकरी पिक विमा काढु शकले नाहीत.एकंदरीत जास्तीत जास्तक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग नोंदविता यावा,याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ करीता पिक विमा काढण्यासाठी ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.       पिक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरीता ७/१२ किंवा ८अ, आधार कार्ड, पिक पेराबाबत स्वकयं घोषणापत्र व बॅंक पासबुकची प्रत आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.पिक विम्याचे अर्ज शेतकरी स्वतः, सामाईक सुविधा केंद्र (सीएससी), बॅंका आणि विमा कंपनी प्रतिनिधी यांचेकडे करु शकतात.तरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्ह

निर्यात बंधु योजना 1 ऑगस्टला कार्यशाळा

Image
निर्यात बंधु योजना  1 ऑगस्टला कार्यशाळा          वाशिम,दि.31(जिमाका)  जिल्हयातील उद्योजक,निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या निर्यात क्षमता वृध्दीसाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने निर्यात बंधु योजनेअंतर्गत एक दिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृह,नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. यावेळी डीजीएफटीच्या अतिरिक्त महासंचालक स्नेहल ढोके यांची उपस्थिती राहणार आहे.             कार्यशाळेत निर्यात बंधु, आत्मनिर्भर भारत,व्होकल फॉर लोकल आणि मेक इन इंडिया, आयईसी रजिस्ट्रेशन,कस्टम प्रोसिजर, एमएसएमई योजना आणि ई-कॉमर्स याबाबत सविस्तर व्हिडिओ सादरीकरण करण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनी, सर्व औद्योगिक संघटना, निर्यात इच्छुक उद्योजक, नवउद्योजकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत यांनी केले आहे.                          *******

वसतिगृहात निवास व्यवस्था नसल्यास मुलामुलींनी प्रवेश घेऊ नये ....समाज कल्याण विभागाचे आवाहन

Image
वसतिगृहात निवास व्यवस्था नसल्यास मुलामुलींनी प्रवेश घेऊ नये  समाज कल्याण विभागाचे आवाहन वाशिम दि.२९(जिमाका) जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या मुख्याध्यापक व अधीक्षकांना सूचना देऊन मुलांमुलींच्या निवासाची व्यवस्था नसल्यास प्रवेश देवु नये असे निर्देश देण्यात आले आहे.निर्देश देऊनही आदेशाचे पालन आश्रमशाळाचे मुख्याध्यापक व वसतिगृहाचे गृहपाल करत नसतील तर त्यांच्यावर आश्रमशाळा संहिता शिस्त व अपील तरतुदीखाली कारवाई करण्यात येईल असे कळविले आहे.               जिल्ह्यातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने संबंधीत आश्रमशाळेवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांना कळविले आहे.मासिक सभेत आश्रमशाळा व वसतिगृहाच्या मुख्याध्यापक व अधीक्षकांना आश्रमशाळा संहितेनुसारच विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देण्याबाबत व त्यामध्ये सातत्य ठेवण्याबाबत सक्त निर्देश देण्यात आले आहे.याबाबत कोणतीही  उणीव आढळून आल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल तसेच कोणत्याही आश्रमशाळेत महिला अधिक्षिका तसेच प

कोतवाल पदभरती परीक्षा - २०२३ परीक्षा केंद्राच्या १०० मिटर परिसरात कलम १४४ लागू

Image
कोतवाल पदभरती परीक्षा - २०२३ परीक्षा केंद्राच्या १०० मिटर परिसरात कलम १४४ लागू          वाशिम, दि.२८ (जिमाका) कोतवाल पदभरती परीक्षा -२०२३ वाशिम शहरातील ६ परीक्षा केंद्रावर ३० जुलै  रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत घेण्यात येणार आहे.परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या १०० मिटर परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच परीक्षेसंबंधीचे गैरप्रकार घडू नये म्हणून फौजदारी दंड प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू राहील.           ही परीक्षा वाशिम येथील राजस्थान आर्य महाविद्यालय,श्री शिवाजी विद्यालय,श्रीमती मालतीबाई सरनाईक कन्या शाळा,राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा,श्री बाकलीवाल विद्यालय आणि एसएमसी इंग्लिश स्कुल या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.            परीक्षा केंद्राच्या परिसरात ३० जुलै रोजी कलम १४४ चे आदेश लागू राहणार असल्यामुळे परीक्षा उपकेंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही.१०० मिटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी,उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक,समवेक्षक,सहाय्यक कर्मचारी,परीक्षार्थी,परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचेकडून नियुक्त केलेले

मासेमारी संकट निवारण निधीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थीला धनादेश वाटप

Image
मासेमारी संकट निवारण निधीचा  जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थीला धनादेश वाटप          वाशिम,दि.२८(जिमाका)  मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने मासेमारी संकट निवारण निधीअंतर्गत मानोरा तालुक्यातील रुई(गोस्ता) येथील श्री.वाघामाय देवी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद स्व.महादेव चवरे यांच्या वारसदार श्रीमती अनिता चवरे यांना २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते १ लक्ष रुपये धनादेशाचे वितरण करण्यात आले.यावेळी मत्स्यव्यवसायचे सहायक आयुक्त मनोज जयस्वाल आणि सहायक मत्स्यव्यवसाय अधिकारी ए.व्ही.जाधव यांची उपस्थिती होती.                             *******

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास मंडळाची कर्ज योजना.. लाभ घेण्याचे आवाहन

Image
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास मंडळाची कर्ज योजना लाभ घेण्याचे आवाहन वाशिम,दि.२८(जिमाका)संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गात येणाऱ्या चर्मकार समाजातील चांभार,ढोर,होलार व मोची यांच्याकरीता आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात.             सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी योजना राबविण्यात येत आहे. ४ हजार ८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.            एनएसएफडीसी,नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेससाठी १ लक्ष ते २ लक्ष रुपयापर्यंत,चर्मोद्योगासाठी २ लक्ष रुपये आणि लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजनेसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये आहे. या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तीकरीता २२ कोटी २१ लक्ष रुपये निधी प्राप्त झाला आहे.            सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एनएसएफडीसीच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेससाठी ५ लक्ष रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजनेसाठी प्रत्येकी १ लक्ष १० हजार रुपये आणि नवीन महिला

सुरक्षित फवारणी अभियान फवारणी रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
सुरक्षित फवारणी अभियान फवारणी रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ वाशिम, दि.२८ (जिमाका) कृषी विभाग व सिंजेन्टा इंडिया प्रा.लि. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेरनेस अँड रिफॉर्म- इसार, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने "सुरक्षित फवारणी अभियान - २०२३ अंतर्गत सुरक्षित फवारणी रथाचा शुभारंभ आज २८ जूलै रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., यांच्याहस्ते रथाची फित कापून करण्यात आला.यावेळी आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी,सिंजेन्टा कंपनी, पूणेचे श्री.राजशेखर, श्री.मनोहर व अन्य मान्यवर उपस्थित होते.            आजपासून पुढील ४५ दिवस हा सुरक्षित फवारणी रथ जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये जाऊन कीटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाच्या खबरदारीबाबत शेतकरी बांधवांना फवारणीचे मार्गदर्शन करून जनजागृती करणार आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी या सुरक्षा फवारणी रथाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन पिकांवर फवारणी करावी.असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.                  *******

वर्तुळाकार अर्थव्यवस्था अभियान - २०२३...९ वा शालेय जागृती कार्यक्रम

Image
वर्तुळाकार अर्थव्यवस्था अभियान - २०२३ ९ वा शालेय जागृती कार्यक्रम वाशिम,२८(जिमाका) खाण मंत्रालय आणि पोलाद मंत्रालय जेएनएआरडीडीसी,नागपूर आणि नाल्को,एनएमडीसी आणि एमएसटीसी आणि एमआरएआय यांच्या सहकार्याने वर्तुळाकार अर्थव्यवस्था मोहिमेची मालिका आयोजित करीत आहे. सन २०२३ हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या स्मरणार्थ आझादी का अमृत महोत्सव (AKAM) अंतर्गत पर्यावरणासाठी टिकाऊपणा/जीवनशैली (LiFE) वर आधारित आहे.          मेटल क्षेत्रातील वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबद्दल जागरूकता आणण्यासाठी,जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाइन सेंटर विदर्भातील ११ जिल्ह्यांतील २२ ULB शाळांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित करत आहे.त्याचाच एक भाग म्हणून ९ वा कार्यक्रम आज वाशिम येथील नियोजन भवनातील सभागृहात संपन्न झाला.राणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल व जि.प. हायस्कूल,मंगरुळपीर येथील विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.               कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांच्याहस्ते झाले.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा

गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह 31 जुलैपर्यंत प्रवेश अर्ज मागविले

Image
गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह 31 जुलैपर्यंत प्रवेश अर्ज मागविले         वाशिम, दि. 26 (जिमाका) :  गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह,नालंदानगर, वाशिम या वसतीगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता रिक्त असलेल्या जागी जातीनिहाय असलेल्या आरक्षणानुसार गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे व त्यासाठी प्रवेश अर्ज वाटप करण्यात येत आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 31 जुलै 2023 आहे. कार्यालयीन वेळेत प्रवेश अर्ज सादर करावे. रिक्त असलेल्या जागेतून अनुसूचित जाती - 32,अनुसूचित जमाती - 1, इतर मागासवर्ग - 4, विमुक्त जाती भटक्या जमाती - 3, विशेष मागासवर्ग - 2, दिव्यांग -1 आणि अनाथ - 1 अशा एकूण 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.             प्रवेशासाठी अटी व पात्रता पुढीलप्रमाणे आहे.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.विद्यार्थी किमान 75 टक्के गुण मिळवून जून 2023 मध्येच इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावा. एकूण मान्य संख्या 100 त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 80 टक्के, इतर मागासवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी प्रत्येकी 5 टक्के, अनुसूचित जातीसाठी 3 टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी 2 ट

२४ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा शहिदांना अभिवादन

Image
२४ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा शहिदांना अभिवादन  वाशिम,दि.२६ (जिमाका) कारगील विजय दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाच्या दिवसांपैकी एक आहे.शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.या दिवसाच्या सन्मानार्थ आजचा २४ वा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहीदांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्याहस्ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.         यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम व अपूर्वा बारसू,निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी (महसूल ) मोहन जोशी,जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.             श्रीमती बुवनेश्वरी यांनी उपस्थित वीर पत्नी शांताबाई सरकटे, पार्वतीबाई दगडू लहाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.          कार्यक्रमाला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक संजय द

विधी सेवा प्राधिकरणाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण व कायदेविषयक जनजागृती

Image
विधी सेवा प्राधिकरणाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण व कायदेविषयक जनजागृती वाशिम,दि.26 (जिमाका) 24 जुलै रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वतीने विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय टेकवाणी यांच्यामार्गदर्शनात विधी स्वयंसेवकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून शहरात विविध भागातील लोकांना कायद्याबाबत मार्गदर्शन केले.       यावेळी आनंदवाडी,अकोला नाका,ग्रामीण पोलीस स्टेशन समोर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर,पाटणी चौक,भिमनगर,चामुंडा देवी, निमजगा,संत ज्ञानेश्वरनगर व वाल्मिकनगर या भागात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात आली. यावेळी एकही बालक शाळाबाह्य आढळले नाही तसेच यावेळी विधी स्वयंसेवकांनी कायदेविषयक माहितीपत्रके वितरीत केली.          शाहीर उत्तम इंगोले यांनी आपल्या भारदस्त आवाजात जनजागृती गाणे म्हणूण जनजागृती केली.या संपूर्ण उपक्रमासाठी विधी स्वयंसेवक सुशील भिमजियाणी, जगदीश मानवतकर, राजकुमार पडघाण,माधव डोंगरदिवे,शाहीर उत्तम इंगोले, मनीषा दाभाडे,उषा वानखेडे, शीतल बन्सोड,मेघा दळवी,उत्तम धाबे,शिवाजी चाबुकस्वार व गणेश पंडित यांनी परिश्रम घेतले.                    ***

28 व 29 जुलै रोजी इव्हीएम मशिनची अभिरुप मतदान प्रक्रीया ..मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी उपस्थित राहावे..निवडणूक विभागाचे आवाहन

Image
28 व 29 जुलै रोजी इव्हीएम मशिनची अभिरुप मतदान प्रक्रीया मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी उपस्थित राहावे निवडणूक विभागाचे आवाहन         वाशिम, दि. 24 (जिमाका) :  भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयाकरीता EVM/VVPATs नवीन प्राप्त मशिनच्या प्रथमस्तरीय तपासणी 4 जुलै 2023 पासून सुरु करण्यात आली आहे. या मशिनमध्ये आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे प्रथमस्तरीय तपासणी FLC OK झालेल्या मशिन्सपैकी 1 किंवा 2 टक्के मशिन्सची अभिरुप मतदार प्रक्रीया (MOCK POLL) करण्यात येणार आहे.             जिल्हयाकरीता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी प्राप्त EVM/VVPATs मशिन्सची अभिरुप मतदान प्रक्रीया (MOCK POLL) नविन EVM/VVPATs गोडाऊन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 28 व 29 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजतापासून करण्यात येणार आहे. ही प्रक्रीया करतेवेळी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे. असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिम यांनी केले आहे. *******

45 हजार हेक्टरवरील शेतपीक बाधित पावसाने खरडून गेले 1750 हेक्टर क्षेत्र

Image
45 हजार हेक्टरवरील शेतपीक बाधित पावसाने खरडून गेले 1750 हेक्टर क्षेत्र         वाशिम, दि. 24 (जिमाका) :  जिल्हयात 5 जुलै ते 22 जुलै या कालावधीत झालेल्या पावसामुळे 45 हजार 874.38 हेक्टर शेतपिकाचे क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. 5 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील येवता मंडळातील 2 हेक्टरवरील कपाशी व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. 12 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील येवता व उंबर्डा (बाजार) महसूल मंडळातील 36 हेक्टरवरील कपाशी, तूर व सोयाबीन पीक, 14 ते 16 जुलै दरम्यान मानोरा तालुक्यातील इंझोरी मंडळातील 111 हेक्टरवरील आणि मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी (ताड) मंडळातील 340 हेक्टरवरील कपाशी, तूर व सोयाबीनचे, 18 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील खेर्डा (बु.) व पोहा मंडळातील 4 हजार 311 हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद व मुंग व मंगरुळपीर मंडळातील 1 हजार 463 हेक्टरवरील सोयाबीन व तूर, 19 जुलै रोजी कारंजा मंडळातील 335.5 हेक्टरवरील कपाशी, तूर व सोयाबीन आणि मालेगांव तालुक्यातील वाडी रामराव व पिंपळशेंडा मंडळातील 45 हेक्टरवरील सोयाबीन व तूर पिकाचे नुकसान झाले.            20 जुलै रोजी

श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली

Image
श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली    वाशिम दि.२४ (जिमाका) श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी आज २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्विकारली.जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन एस.यांची राज्य शासनाने मुंबई येथे अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) या पदावर बदली केल्याने श्रीमती बुवनेश्वरी एस.यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली.          भारतीय प्रशासकीय सेवेतील सन २०१५ च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या श्रीमती बुवनेश्वरी ह्या तामिळनाडू राज्यातील मद्रास येथील रहिवासी आहेत.त्यांनी संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.यापूर्वी त्यांनी परिविक्षा कालावधीत कोल्हापूर येथे सहायक जिल्हाधिकारी,यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. नाशिक व भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,नागपूर येथे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,नागपूर येथील वनामतीच्या महासंचालक आणि वाशिम येथे रुजू होण्यापूर्वी त्या धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.जिल्ह्यात आरोग्य व शिक्षणाकडे विशेष लक्ष देणार

पीक नुकसानीचे व जमीन खरडून गेल्याचे पंचनामे तातडीने करा -पालकमंत्री संजय राठोड .. नुुकसानीचा एकत्रित प्रस्ताव सादर केल्यास निश्चितच निधी उपलब्ध करुन देवू -अनिल पाटील.. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा 29 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

Image
पीक नुकसानीचे व जमीन खरडून गेल्याचे पंचनामे तातडीने करा                                                           -पालकमंत्री संजय राठोड नुकसानीचा एकत्रित प्रस्ताव सादर केल्यास निश्चितच निधी उपलब्ध करुन देवू                                                           -अनिल पाटील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा 29 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज           वाशिम, दि. 23 (जिमाका) :  जिल्हयात 19 आणि 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने मोठया प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पिके असलेली जमीन देखील खरडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे आणि जमीन खरडून गेल्याचे पंचनामे यंत्रणांनी वस्तुनिष्ठ पध्दतीने तातडीने करावे. असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.             आज 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हयात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा आयोजित सभेत घेतांना पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी मदत, पुनर्वसन व आपत्ती

२३ जुलै रोजी पालकमंत्री श्री. संजय राठोड‌ जिल्ह्यात

Image
२३ जुलै रोजी पालकमंत्री श्री. संजय राठोड‌ जिल्ह्यात वाशिम,दि.२२ (जिमाका) मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री श्री.संजय राठोड हे २३ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी १०.३० वाजता शासकीय वाहनाने यवतमाळ येथून वाशिमकडे प्रयाण,दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा बैठकीस उपस्थिती,दुपारी १.३० वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथे आगमन व राखीव,दुपारी २ वाजता यवतमाळकडे प्रयाण करतील.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील २३ जुलै रोजी जिल्ह्यात

Image
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील २३ जुलै रोजी जिल्ह्यात वाशिम दि.२२ (जिमाका) मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे २३ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवारी २३ जुलै रोजी सकाळी ११  वाजता यवतमाळ येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण करतील. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आगमन व वाकाटक सभागृहात आयोजित नैसर्गिक आपत्तीविषयक आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी १ ते २ वाजतापर्यंत राखीव.दुपारी २ वाजता मेहकर,चिखलीमार्गे बुलढाणाकडे प्रयाण करतील.

नैसर्गिक आपत्ती प्राथमिक अहवाल; जिल्ह्यात २ पशूधन मृत व १४ घरांची अंशतः पडझड

Image
नैसर्गिक आपत्ती प्राथमिक अहवाल; जिल्ह्यात २ पशूधन मृत व १४ घरांची अंशतः पडझड   वाशिम,दि.२२(जिमाका) जिल्ह्यात २२ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मागील २४ तासात सरासरी ३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासूनच सुरू असलेला संततधार पाऊस व पुरामुळे पशुधन व घरांची पडझड आदी नुकसान झाले.                     प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार मानोरा तालुक्यात २ जनावरे मृत्युमुखी पडली. मानोरा तालुक्यात ४, मंगरूळपीर तालुक्यात २,रिसोड तालुक्यात १ व कारंजा तालुक्यात ७ अशा एकूण १४ घरांची अंशतः पडझड झाली.आज २२ जुलै रोजी जिल्ह्यात कारंजा,मानोरा, मालेगाव व मंगरूळपीर तालुक्यात पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पिक व शेतजमीनीच्या नुकसानीची माहिती तालुकास्तरावरून सद्यस्थितीत अप्राप्त असल्यामुळे शेत पिकांचे व जमिनीचे नुकसान या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलेले नाही.

महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .. मुख्यमंत्री यांनी घेतली सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सद‍िच्छा भेट

Image
महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ                                                                               मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी घेतली सहकुटुंब  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सद‍िच्छा भेट नवी दिल्ली 22 : राज्यात सुरू असलेल्या  विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.            आज मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी  सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. श्री शिंदे यांनी त्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे  नातु रूद्रांश यांच्या समवेत भेट घेतली.           या भेटी दरम्यान कुटुंबीयांची प्रधानमंत्री यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली असल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले

नागरिकांनो ! पूरपरिस्थितीत खबरदारी घ्या ...जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Image
नागरिकांनो ! पूरपरिस्थितीत खबरदारी घ्या जिल्हा प्रशासनाचे आवाहन  २३ ते २५ जुलै येलो अलर्ट वाशिम,दि.२२ (जिमाका)भारतीय हवामान विभाग,नागपूर यांनी आज  २२ जूलै रोजी जिल्हासाठी ऑरेंज अलर्ट तसेच २३ ते २५ जूलैपर्यंत येलो अलर्ट दर्शविण्यात आला आहे. जिल्हयात पावसाची संततधार सुरू असल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा अंदाज घेऊनच लोकांनी कामकाजाचे नियोजन करावे.नदी-नाल्यांना पुर आल्यास त्याठिकाणी नागरीक,महिला व लहान मुलांनी पुलावरुन रस्ता ओलांडू नये. नागरीकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्यांचे ठिकाणी जाण्याचे टाळावे.कोणीही मासेमारी करण्यास तलाव,धरण किंवा नदयामध्ये जाऊ नये.पुराच्या ठिकाणी सेल्फी काढू नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. *पुरपरिस्थितीत काय करावे* पूर परिस्थितीत उंच ठिकाणी जावे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.गावात / घरात जंतुनाशके असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पूरासंदर्भात पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान व महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी हलवावी. *पूरपरिस्थितीत उद्भवल्यास काय करू नये* पूर असलेल्या

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व वैयक्तिक लाभासाठी अर्ज मागविले

Image
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना वैयक्तिक लाभासाठी अर्ज मागविले वाशिम,दि. 21 (जिमाका) विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटूंबाचे जीवनमान उंचावावे,त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी तसेच त्यांनी विकासाच्या मूळ प्रवाहात येता यावे.यासाठी ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना,रमाई आवास योजनेच्या धर्तीवर अथवा प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक पात्र लाभार्थी कुटूंबासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.             या योजनेच्या लाभासाठी पात्रता व निकष पुढीलप्रमाणे आहे. लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती, भटक्या जमाती या मूळ प्रवर्गातील असावे.लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न १ लक्ष २० हजार रुपयाच्या आत असावे.लाभार्थी कुटूंब बेघर अथवा कच्चे घर/झोपडी/पालामध्ये राहणारे असावे.लाभार्थी कुटूंब अल्पभूधारक असावे.लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. लाभार्थी कुटूंबाने राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.लाभार्थ्याचे वर्षभरात ६ महिने एका ठिकाणी वास्तव्य असावे.या योजनेचा

२५ व २६ जूलै ऑनलाईन रोजगार मेळावा

Image
२५ व २६ जूलै ऑनलाईन रोजगार मेळावा वाशिम,दि.२१(जिमाका) जिल्हयातील नोकरी / रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयाच्या वतीने २५ ते २६ जूलै २०२३ दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे.          या ऑनलाईन मेळाव्यामध्ये क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण,वाशिम / अकोला, हयोसुंग इंडीया प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर,हिताचि आस्टेमो ब्रेक सिस्टिम इंडीया,प्रा.लि.बांभोरी - जळगांव,एल.आय.सी.विमा कार्यालय,वाशिम,पिपल ट्री व्हेन्चर्स प्रा. लि. पूणे / छत्रपती संभाजीनगर धुत ट्रॉन्समिशन प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर इत्यादी नामांकित कंपनी /उद्योगाकडील उद्योजक वा त्यांचे प्रतिनिधी मेळाव्यात ऑनलाईन सहभाग नोंदविलेल्या नोकरी इच्छूक उमेदवारांच्या पुढील टप्प्यात ऑनलाईन / प्रत्यक्ष मुलाखती घेवून निवड प्रक्रिया पूर्ण करतील. यासाठी १० वी,१२ वी,आय.टी.आय. (सर्व ट्रेडस्), पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान),पदव्युत् तर पदवी (सर्व शाखा) इ. शैक्षणीक पात्रता असणारे वयोमर्यादा - १८ ते ४५ मधील युवक-युवतीना ६८ पदांकरीता रोजगा

कांडप यंत्र व पीठ गिरणी योजना अर्ज करण्यास मुदतवाढ

Image
कांडप यंत्र व पीठ गिरणी योजना अर्ज करण्यास मुदतवाढ  वाशिम,दि.२१ (जिमाका) ग्रामिण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात येत असलेल्या २० टक्के निधीमधुन जिल्हयातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती व नवबौध्द या मागासवर्गीयांकरीता कांडप यंत्र पुरविणे या योजनेकरीता सन २०२३-२४ या वर्षासाठी लाभार्थ्यांनी समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद वाशिम येथे २८ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावे.तसेच दिव्यांगांकरीता राखीव ठेवण्यात येत असलेल्या ५ टक्के निधीमधुन ग्रामीण भागातील दिव्यांग गरजूंकरीता पीठ गिरणी ही योजना सन २०२३-२४ या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. ज्या दिव्यांगाचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेकरीता समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद, वाशिम येथे १ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करावे.जिल्हयातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी केले आहे. *******

पावसामुळे ६६४३ हेक्टरवरील पिके बाधित ६ व्यक्तींचा वीज पडून व पुरात वाहून मृत्यू

Image
पावसामुळे ६६४३ हेक्टरवरील पिके बाधित  ६ व्यक्तींचा वीज पडून व पुरात वाहून  मृत्यू  वाशिम दि २१( जिमाका) जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६६४३.५ हेक्टरवरील शेत पिके बाधित झाली आहे.तर १ एप्रिल ते १९ जुलै दरम्यान सहा व्यक्तींचा अंगावर वीज पडून, पुरात पाहून गेल्याने आणि प्रवासी निवारा अंगावर पडल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.                    ५ जुलै रोजी आलेल्या पावसाने कारंजा तालुक्यातील येवती येथील दोन हेक्टरवरील कपाशी व सोयाबीनची, १२ जुलै रोजी उंबरडा  बाजार व येवता येथील ३६ हेक्टरवर असलेल्या कपाशी,तूर व सोयाबीन, १४ ते १७ जुलै रोजी मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १११ हेक्टरवरील तूर,सोयाबीनचे मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी(ताड) येथे ३४० हेक्टरवरील तूर व सोयाबीनचे,१८ जुलै रोजी कारंजा तालुक्यातील खिर्डा(बु) आणि पोहा येथील ४३११ हेक्टर असलेल्या तूर,सोयाबीन,कापूस,उडीद व मूग मंगरूळपीर येथील १४६३ हेक्टर आणि १९ जुलै रोजी कारंजा येथील ३३५ हेक्टर आणि मालेगाव तालुक्यातील वाडी (रामराव) व पिंपळशेंडा येथील ४५ हेक्टर असे एकूण ६६४३.५ हेक्ट

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भूसे यांची समृध्दी महामार्गावरील वारंगी बेस कॅम्प येथे भेट ..समृद्धीवरील अपघात शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील .. दादाजी भुसे

Image
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भूसे यांची   समृध्दी महामार्गावरील वारंगी बेस कॅम्प येथे भेट समृद्धीवरील अपघात शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील                               दादाजी भुसे   वाशिम दि.२१ (जिमाका) सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भूसे यांनी आज २१ जूलै रोजी नागपूर -मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी करतांना मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील समृध्दी महामार्गावरील बेस कॅम्पला भेट दिली.                    भेटीदरम्यान श्री.भूसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या अपघातांमध्ये भौतिक दृष्टिकोन पाहिला तर समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या सध्या तरी कमी आहे.काही अपघात वाहन चालकांच्या बेजबाबदारपणामुळे होत असल्याचे दिसून येत आहे.अपघातांची संख्या शून्यावर आणण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून यावेळी त्यांनी आश्वस्त केले.प्रत्येक व्यक्तीचा प्राण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.राज्याच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प आहे.           समृद्धी महामार्गावरी

पूर व आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे

Image
पूर परिस्थिती व आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे वाशिम,दि.२० (जिमाका) तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने वाशिम तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की,स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करावे. नदी नाले व ओढयाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदिपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडु नये, पुल पाहण्यासाठी गर्दी करु नये, जुनाट किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीचा आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भुस्खलन होण्याची व दरड कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदिच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये, अचानक नदिच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उद्भवु शकतो. धोकादायक ठिकाणी चढु व उतरु नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढु नये मेघगर्जना होत असतांना झाडाच्या खाली न था

पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न.

Image
पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न. वाशिम दि.२०(जिमाका) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प वाशिम आणि प्रकल्प संचालक,आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने समूह सहाय्यकाचे सीएचएमएस प्रशिक्षण आज आत्मा कार्यालय, वाशिम येथे संपन्न झाले.          प्रारंभी डॉ. पंजाबराव देशमुख व नानाजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.अध्यक्षस्थानी आनिसा महाबळे आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे होत्या.उद्घाटन वाशिमच्या कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भरत गिते यांनी केले.यावेळी आत्मा प्रकल्प उपसंचालक संतोष वाळके, उपविभागीय कृषि अधिकारी संजय चातरमल,स्मार्ट प्रकल्पाच्या मार्गदर्शिका अनुजा कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.             सुरुवातीला  प्रकल्प विशेषज्ञ प्रदीप गुट्टे यांनी प्रस्तावित केले. प्रशिक्षणाची गरज याविषयी अनिसा महाबळे यांनी मार्गदर्शन केले. सीएचएमएसचा उद्देश व कार्यपद्धती याविषयी उपविभागीय कृषि अधिकारी श्री.चातरमल यांनी माहिती दिली. खरीप हंगाम पिक व्यवस्थापन खरीप मुख्य पिक कीड व रोग ओळख व व्यवस्थापनाविषयी डॉ.गिते  यांनी, सीएच

तृतीयपंथीयांसाठी काम करण्यास इच्छुक स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविले

Image
तृतीयपंथीयांसाठी काम करण्यास इच्छुक स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविले         वाशिम, दि. 20 (जिमाका) : तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिसऱ्या महिला धोरणामध्ये समाविष्ट आहे. तृतीयपंथीय/ट्रान्सजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक आहे. या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जाते. नेहमीच भेदभाव,सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासनामार्फत मुलभूत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.           तृतीयपंथीय/ट्रान्सजेंडर यांना कायद्याने निश्चित अशी ओळख/स्थान मिळवून देणे,त्यांना सामाजिक संरक्षण प्राप्त करुन देणे, तृतीयपंथीयांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होवू नये. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांचा आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे. त्यासाठी संघटित प्रयत्न करणे तसेच या समाज घटकांची सर्वांगिण उन्नती व्हावी, त्यांना समा

ऊसतोड कामगारांनी योजनांच्या लाभासाठी ग्रामसेवकाकडून ओळखपत्र घ्यावेसमाज कल्याण विभागाचे आवाहन

Image
ऊसतोड कामगारांनी योजनांच्या लाभासाठी ग्रामसेवकाकडून ओळखपत्र घ्यावे समाज कल्याण विभागाचे आवाहन         वाशिम, दि. 20 (जिमाका) :  ऊसतोड कामगारांचे व त्यांच्या कुटूंबियांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊसतोडणी व्यवसायातील ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केले आहे.             ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा, याकरीता राज्यातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील तीन वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांची ग्रामसेवकामार्फत संबंधित गावातील, वस्त्यांमधील,तांड्यामधील व पाड्यांमधील व इतर नोंदणी करण्यात येणार असून ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यासाठीचा सर्व्हेक्षण/आवेदन पत्राचा, स्वयंघोषणापत्राचा व ओळखपत्राचा विहीत नमुना जीमेलद्वारे तसेच ऊसतोड कामगारांची नोंदणी जलद व सुलभ होण्याच्या हेतूने गुगल फॉर्म लिंकसुद्धा ज

पिंपरी (मोडक) शाळेतील विद्यार्थ्यांना दिलीत ंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती

Image
पिंपरी (मोडक) शाळेतील विद्यार्थ्यांना दिली तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती         वाशिम, दि. 20 (जिमाका) :  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत कारंजा तालुक्यातील पिंपरी (मोडक) येथे विघ्नेश्वर उच्च प्राथमिक आश्रमशाळा येथे तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती देण्यात आली. यावेळी मानसशास्त्रज्ञ राम सरकटे यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे मुख कर्करोग, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे विविध आजार व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.          सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी आपली शाळा तंबाखूमुक्त करण्याबाबत करावयाच्या उपाययोजना, तंबाखूमुक्त शाळेचे निकष व तंबाखूचे सेवन सोडविण्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक 1800112356 याबाबत माहिती दिली. कामरगाव ग्रामीण रुग्णालयाचे एन.सी.डी समुपदेशक गणेश रवणे यांनी तंबाखूजन्य पदार्थापासून विद्यार्थ्यांनी कसे दूर राहावे व इतरांना त्यापासून कसे परावृत्त करावे याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शाळ

वित्त आणि विकास महामंडळ कर्ज योजना कर्जासाठी अर्ज मागविले

Image
वित्त आणि विकास महामंडळ कर्ज योजना कर्जासाठी अर्ज मागविले         वाशिम, दि. 20 (जिमाका) :  इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी कर्ज योजना राबवित आहे. महामंडाळाच्या या योजनेचे उदिष्ट पुढीलप्रमाणे. २० टक्के बीज भांडवल योजना- या योजनेची कर्ज मर्यादा ५ लक्ष रुपये बँकेचा सहभाग ७५ टक्के, महामंडळाचा सहभाग २० टक्के व लाभार्थ्यांचा सहभाग ५ टक्के आहे. या रक्कमेचा परतफेडीचा कालावधी ५ वर्षाचा आहे. प्रकल्प रक्कम २ लक्ष ५० हजार रुपयापर्यंत आहे. भौतिक उदिष्ट २३ आणि आर्थिक ९.२० पर्यंत आहे. थेट कर्ज योजनाची कर्ज मर्यादा १ लक्ष रुपये आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी ४ वर्ष आहे. प्रकल्प रक्कम १ लक्ष रुपयापर्यंत असून भौतिक उद्दीष्ट ११० आणि आर्थिक ११० आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना - (ऑनलाईन) या योजनेची कर्ज मर्यादा १० लक्ष रुपये आहे. प्रकल्प रक्कम १० लक्ष रुपये असून भौतिक उदिष्ट १२२ आणि आर्थिक १३५.६५ पर्यंत आहे. गट कर्ज व्याज परतावा योजना (ऑनलाईन) आहे. यासाठी कर्ज मर्यादा ५० लक्ष रुपये आहे. प्रकल्प रक्कम रु ५० लक्ष रुपये असून भौतिक उदिष्ट १३ आणि आर्

कोतवाल पदभरती : पारदर्शक पध्दतीने करण्यास सहकार्य करा वाशिम तहसिलदार यांचे आवाहन

Image
कोतवाल पदभरती : पारदर्शक पध्दतीने करण्यास सहकार्य करा वाशिम तहसिलदार यांचे आवाहन         वाशिम, दि. 19 (जिमाका) :  वाशिम तालुक्यात उपविभागीय अधिकारी, वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली कोतवाल पदभरती-२०२३ ची प्रक्रिया सुरु आहे. कोतवाल पदभरतीच्या परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी तहसिल कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. कोतवाल पदभरती प्रक्रीया अत्यंत पारदर्शक पध्दतीने करण्यात येत आहे. या पदभरती संदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडून कोणीही कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण करु नये. तसेच अपप्रचार करणाऱ्या व्यक्तींचे समर्थन करु नये. कोतवाल पदभरती- २०२३ ची प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने करण्याकरीता सहकार्य करावे. असे आवाहन तहसिलदार, वाशिम यांनी केले आहे. *******