कोतवाल पदभरती परीक्षा - २०२३ परीक्षा केंद्राच्या १०० मिटर परिसरात कलम १४४ लागू



कोतवाल पदभरती परीक्षा - २०२३

परीक्षा केंद्राच्या १०० मिटर परिसरात कलम १४४ लागू
       
 वाशिम, दि.२८ (जिमाका) कोतवाल पदभरती परीक्षा -२०२३ वाशिम शहरातील ६ परीक्षा केंद्रावर ३० जुलै  रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत घेण्यात येणार आहे.परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या १०० मिटर परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच परीक्षेसंबंधीचे गैरप्रकार घडू नये म्हणून फौजदारी दंड प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू राहील.
          ही परीक्षा वाशिम येथील राजस्थान आर्य महाविद्यालय,श्री शिवाजी विद्यालय,श्रीमती मालतीबाई सरनाईक कन्या शाळा,राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा,श्री बाकलीवाल विद्यालय आणि एसएमसी इंग्लिश स्कुल या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. 
          परीक्षा केंद्राच्या परिसरात ३० जुलै रोजी कलम १४४ चे आदेश लागू राहणार असल्यामुळे परीक्षा उपकेंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही.१०० मिटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी,उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक,समवेक्षक,सहाय्यक कर्मचारी,परीक्षार्थी,परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचेकडून नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी सोडून इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. परिक्षा उपकेंद्रावर १०० मिटरच्या आत रस्त्यावरुन वाहने नेण्यास मनाई राहील. परीक्षा केंद्रातील १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन,एसटीडी,आयएसडी, झेरॉक्स,फॅक्स,ई-मेल व ध्वनीक्षेपके इत्यादी सुविधांवर प्रतिबंध राहील. तसेच या उपकेंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट,रेडिओ,दूरदर्शन, कॅलक्युलेटर व संगणक वापरण्यावर बंदी राहील.उपकेंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी चारपेक्षा जास्त व्यक्ती प्रवेश करणार नाही.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा आदेश ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजतापासून ते दुपारी २ वाजतापर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी कळविले आहे.       
                 *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे