जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाची जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती


जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाची

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती

वाशिम, दि.11(जिमाका) जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती अभियान व समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी विधी स्वयंसेवक शाहीर उत्तम इंगोले यांनी मनोरंजनात्मक शैलीतुन लोक जनजागृतीपर गाणी सादर करुन उपस्थितांचे प्रबोधन केले.तसेच लोकसंख्या वाढीचे वर्तमान व भविष्यातील दुष्परिणामाबाबत लोकांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांना सुनिता रनवीर,सुनिल लबडे व सचिन भालेराव यांनी सहकार्य केले.जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक व इतर नागरीकांना विधी स्वयंसेवक सुशिल भिमजियाणी, मोतिराम खडसे, मनिषा दाभाडे, उषा वानखेडे व शितल बनसोड यांनी कायदेविषयक जनजागृतीपर हस्तपत्रके वाटुन कायद्याबाबत माहिती दिली.
                  *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे