शासन आपल्या दारी घरपोच दुय्यम शिधापत्रिका व नाव कमी जास्त करणे अभियान




शासन आपल्या दारी

घरपोच दुय्यम शिधापत्रिका व नाव कमी जास्त करणे अभियान

        वाशिम, दि. 17 (जिमाका) : रिसोड तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी ९ जून २०२३ पासुन घरपोच दुय्यम शिधापत्रिका अभियान राबविणे सुरु आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याला जोड म्हणुन ग्रामीण शिधापत्रिकाधारकांचा वेळ व पैसा वाचवा या दृष्टीकोनातुन नाव कमी करणे व समाविष्ठ करणे आणि नावे ऑनलाईन करण्याकरीता शिधापत्रिकाधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गावचे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत विहीत नमुन्यात अर्ज भरुन व आवश्यक कागदपत्रे जमा करावे. जेणेकरुन घरपोच दुय्यम शिधापत्रिका व शिधापत्रिकेतुन नाव वगळणे किंवा समावेशीत करुन गावातच शिधापत्रिका मिळणार आहे. तरी " शासन आपल्या दारी " या नाविन्यपुर्ण योजनेचा जास्तीत जास्तीत जास्त शिधापत्रिकाधारकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन तहसिलदार रिसोड व पुरवठा विभागाने केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे