कोतवाल पदभरती : आर्थिक देवाण-घेवाण करु नये उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे आवाहन


कोतवाल पदभरती : 
आर्थिक देवाण-घेवाण करु नये

उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे आवाहन 

वाशिम,दि.१४ (जिमाका) जिल्ह्यातील तहसिल कार्यालय,कारंजा व मानोरा अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्राकरिता उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे अध्यक्षतेखाली कोतवाल पदभरती- 2023 ची प्रक्रिया सुरु आहे.ही कोतवाल पदभरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने करण्यात येत आहे.या पदभरती संदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडून कोणीही कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाण करु नये.तसेच असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्तींना समर्थन करु नये.  
         जिल्ह्यातील कारंजा उपविभागातील कारंजा व मानोरा तालुक्यातील कोतवाल पदभरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शपणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर